शिवसेनेतर्फे आचरा येथे आयोजित नेत्र शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून आयोजन

आचरा–अर्जुन बापर्डेकर

 

शिवजयंती निमित्त आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून व सहकार्याने आचरा येथे आयोजित नेत्र तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात एकूण 310रुग्णांनी नेत्र चिकीत्सा करून घेतली. यातील 163जणांना मोफत चष्मे वाटप केले जाणार आहे.तर 81जणांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिवसेनेच्या माध्यमातून केली जाणार आहे. या
शिबिराचे उदघाटन आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी , रामेश्वर सार्वजनिक वाचनालय अध्यक्ष बाबाजी भिसळे यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाले.

यावेळी शिवसेनेचे जयप्रकाश परुळेकर,रुपेश पाटकर, अभय भोसले, चावल मुजावर, मांगिरीष सांबारी, पंकज आचरेकर, चंदू कदम,महेंद्र घाडी,विजय कदम,उदय घाडी,श्रीपाद वायंगणकर,दिलीप कावले,आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, यांसह मंगेश मेस्त्री, तोंडवळी तळाशिल येथील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते ,डॉ विपूल गांधी, निलेश म्हात्रे यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.

जिल्हा परीषद सदस्या वर्षा सांबारी,पंचायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर यांच्या आयोजनातून शिवसेनेतर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *