अक्षरोत्सव परिपूर्ण ऐतिहासिक दस्तऐवज :- वसंथा राय 

0 minutes, 3 seconds Read

तळेरे येथील अक्षरघराला भेट : संग्रहाचे केले कौतुक

 

कणकवली (प्रतिनिधी)

 

आपला अक्षरोत्सव हा संग्रह म्हणजे परिपूर्ण असा ऐतिहासिक दस्तऐवज आहे. याचे व्यवस्थित जतन करून ठेवणे आणि ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे महत्वाचे आणि तितकेच जबाबदारीचे काम आहे. ते तुम्ही विविध ठिकाणी प्रदर्शने आयोजित करून अत्यंत कल्पकतेने देशाच्या युवा पिढीपर्यंत पोहोचवत आहात. हे कार्य अधिकाधिक व्यापक व्हावे, असे प्रतिपादन एचपीसीएल चे सेवानिवृत्त मुख्य व्यवस्थापक वसंथा राय (हैदराबाद) यांनी केले.

 

तळेरे येथील आगळावेगळा संग्रह असलेल्या अक्षरघराला एचपीसीएल चे सेवानिवृत्त मुख्य व्यवस्थापक वसंथा राय (हैदराबाद) आणि वारगाव विकास मंडळाचे अध्यक्ष, एचपीसीएल चे सेवानिवृत्त वरिष्ठ व्यवस्थापक विजय केसरकर यांनी भेट दिली. यावेळी अक्षरोत्सव संग्रहाची पाहणी केली आणि प्रोत्साहन देत कौतुक केले. यावेळी ते बोलत होते.

 

यावेळी अनेक संदेश पत्रे आवर्जून त्यांनी वाचली. कुतूहलापोटी अनेक व्यक्तींविषयी सविस्तर जाणूनही घेतले. तसेच, या संग्रहाची संकल्पना कशी सुचली याबाबतही माहिती घेतली. तसेच, काही महत्त्वाच्या सूचनाही यावेळी केल्या.

अक्षरघराला यांनी दिली भेट (चौकट) तळेरे येथील अनोखी संकल्पना असलेल्या अक्षरघराला विविध क्षेत्रातील व्यक्तींनी भेट देऊन प्रशंसा केली आहे. ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. सुनिलकुमार लवटे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर, आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू पूनम राऊत, फुटबॉल खेळाडू जयेश राणे, प्रसिध्द नाट्य समिक्षक अरुण घाडिगावकर, अभिनेते, दिग्दर्शक संजय खापरे, दिग्दर्शक दिपक कदम, गझलकार मधुसूदन नानिवडेकर, कवी गीतकार प्रसाद कुलकर्णी,

 

साहित्यिक, कथाकथनकार वृंदा कान्बळी, आंतररष्ट्रीय पंच अशोक दाभोलकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या नेमबाज रोहिणी हवालदार, कवी प्रा. प्रदिप पाटिल, ज्येष्ठ विचारवंत वैजनाथ महाजन, आंतरराष्ट्रीय कामगार नेते विद्याधर राणे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, अभिनेत्री प्राजक्ता वाडये, इस्लामपुरचे डीवायएसपी कृष्णात पिंगळे, चित्रकार राज शिंगे, सुप्रसिध्द चित्रकार प्रकाश कब्रे,

 

पर्यावरण अभ्यासक- लेखक धीरज वाटेकर, जीवन प्रबोधनी ट्रस्टचे संस्थापक सत्यवान नर, महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टचे विजय घरत, घुंगुरकाठीचे संस्थापक सतिश आणि सौ. सई लळीत, माजी राज्यपालांचे सहसचिव प्रा. विनायक दळवी, हास्यसम्राट फेम अभिजित कोष्टी, उपविभागीय तथा प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्यासारख्या अनेक व्यक्तींनी भेट देऊन अक्षरघराचे कौतुक केले आहे.

 

या परदेशी व्यक्तींची पत्रे संग्रहात (चौकट)
निकेतच्या या संग्रहामध्ये जागतिक किर्तिचा खेळाडू, टेनिसच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडू रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड), मुहम्मद युनुस (बांग्लादेश), आयर्लंड देशाचे पंतप्रधान डॉ. लिओ वराडकर, युरोपियन सेन्ट्रल बँकेचे चेअरमन मारिओ ड्राघी (जर्मनी), हॉलीवूड निर्माता अभिनेता दिग्दर्शक सर मायकेल केन (लंडन), अभिनेता जॅकी चेन, अमेरिकन मॉडेल आणि अभिनेत्री कँरोल अल्ट, मॉडेल-अभिनेत्री-गायिका-नृत्यांगना आणि प्राणीमित्र ब्रिजीत बार्दो (पॅरीस), वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे प्रिमीयर मार्क मँकगोवन, सुप्रसिध्द टेनिस खेळाडू स्टेफी ग्राफ, नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ डॉ. अभिजित बॅनर्जी (अमेरिका) या परदेशी व्यक्तींच्या पत्रांचा समावेश आहे. याशिवाय या अनोख्या संग्रहाबद्दल निकेत पावसकर यांची सह्याद्री वाहिनीसह सिंधुदुर्ग आकाशवाणी केंद्र यावर मुलाखतही प्रसारित झाली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *