देवगड (हेमंत पेडणेकर)
कुडाळ येथिल संत राऊळ महाराज महाराज महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाच्या विद्यमानाने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील निबंध लेखन स्पर्धेत देवगड तालुक्यातील पुंडलीक अंबाजी कर्ले महाविद्यालयाच्या श्रावणी हिंदळेकर हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
संत राऊळ महाराज महाराज महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाच्या विद्यमानेआंतरराष्टीय क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्षानिमित्त क्वाॉंटमं युग क्षमता आणि आव्हाने या विषयावर राष्ट्रीय स्तरावर निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत पुंडलीक अंबाजी कर्ले महाविद्यालयाच्या श्रावणी हिंदळेकर सहभागी झाली होती तिने राष्ट्रीय स्तरावरील या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तिला महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अक्षता मोंडकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
तिने मिळविलेल्या नेत्रदिपक यशाबद्दल संस्थाध्यक्ष अरुण कर्ले, संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक, महाविद्यालयाचे चेअरमन संभाजी साटम, प्राचार्य समिर तारी, सर्व प्राध्यापक वर्ग यांनी अभिनंदन केले.
