कोकण उर्दू हायस्कूल विजयदुर्गची बुशरा धोपावकर शिष्यवृत्ती परीक्षेत
कोकण उर्दू हायस्कूल, विजयदुर्ग या विद्यालयातील विद्यार्थिनी कु. बुशरा इम्रान धोपावकर हिने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये झालेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवून गुणवत्तायादीत स्थान प्राप्त केले आहे, ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.
कु. बुशरा हिच्या या यशामुळे शाळेचा नावलौकिक अधिक वाढला असून तिच्या मेहनतीला, जिद्दीला व चिकाटीला सलाम करावासा वाटतो. तिच्या या घवघवीत यशाबद्दल शाळेच्या संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक मिनाज नायकवडी, सहा. शिक्षक आयेशा मुकादम,राबिया ठाकूर,आन्सरा काजी, शिक्षकवृंद यांच्यावतीने तिचे मन:पूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.