नांगरणीवरून बाचाबाची ; डोक्यावर गाडी दुरुस्तीच्या पाना मारून केली दुखापत ; पोयरे येथील घटना

0 minutes, 0 seconds Read

 

 

देवगड : प्रतिनिधी

नांगरणीवरून बाचाबाची ; डोक्यावर गाडी दुरुस्तीच्या पाना मारून केली दुखापत ; पोयरे येथील घटना

शेतजमीनीत नांगरणी करण्यावरून झालेल्या बाचाबाचीतून पोयरे घाडीवाडी येथील संजय जयवंत घाडी(५१) याच्या डोक्यावर गाडी दुरूस्तीचा पाना मारून दुखापत केल्याप्रकरणी देवगड पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी महेश सत्यविजय घाडी(४०) रा.पोयरे घाडीवाडी याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.ही घटना १७ जुन रोजी दुपारी १२ वा.सुमारास घडली.

 

 याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पोयरे घाडीवाडी येथील संजय जयवंत घाडी हे १७ जुन रोजी हे त्यांच्या घराच्या खाली घाडीवाडी येथील सव्र्हे नं. १५५ मध्ये सामाईक जमीनीतील तोंडी वाटणीच्या जमीनीत  ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी करीत होते.त्यांच्या बाजुच्याच जागेमध्ये चुलतभाऊ महेश सत्यविजय घाडी(४०) हे नांगरणी करीत होते.यावेळी महेश यांनी संजय घाडी यांना माझा वाटणीच्या जागेत नांगरणी का करतोस असे विचारले यावेळी संजय यांनी मी माझा वाटणीच्या जागेत नांगरणी करीत आहे असे सांगीतले.यावर महेश यांनी तू नांगरणी करायची नाही असे सांगीतले.संजय यांनी माझा वाट्याचा जागेत नांगरणी करणार असे उत्तर दिले यावर राग येवून तु नांगरणी कशी काय करतोस हे बघतो असे सांगून महेश यांनी हातातील गाडी दुरूस्तीचा पाना संजय यांच्या डोक्यावर मारून दुखापत केली व हाताच्या थापटाने मारून शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली अशी तक्रार संजय जयवंत घाडी यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली.या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित महेश सत्यविजय घाडी याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून तपास पोलिस हवालदार प्रविण सावंत करीत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *