श्रेयवाद आणि टक्केवारी यामुळे नगरपंचायत कार्यक्षेत्रातील विकास कामे रखडली – विलास साळसकर
देवगड (प्रतिनिधी) ७ ऑगस्ट २०२४
देवगड न.पं.मध्ये श्रेयवाद आणि टक्केवारी यामध्ये सत्ताधारी व विरोधक यांच्यात सुरू असलेल्या वादात विकासकामे रखडली असून जनतेचे हाल होत आहेत. कचराप्रश्न, न.पं.हद्दीतील खुल्या क्षेत्रातील अतिक्रमणे, सांडपाणी तसेच लोकांच्या जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न आदी समस्यांचा पाढा शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी मुख्याधिकारी सुरज कांबळे यांच्यासमोर वाचला. न.पं.असून नसल्यासारखीच अशी प्रतिमा जनतेमध्ये निर्माण झाली आहे.ही बदलण्यासाठी सत्ताधारी, विरोधकांबरोबरच प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजेत.पाणी आरक्षण दाखला प्राप्त होवूनही सहा महिने झाले तरी न.पं. कडूनच पुढील प्रक्रिया न झाल्याने नळयोजनेला निधी मंजुर होण्याचे घोडे अडले आहे. त्यामुळे ही प्रक्रिया दहा दिवसात पुर्ण करा निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे साळसकर यांनी सांगीतले.
शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी बुधवारी न.पं.मुख्याधिकारी सुरज कांबळे यांची भेट घेवून विविध समस्यांबाबत लक्ष वेधले. निवडणुका झाल्या तरीही वर्कऑर्डर न मिळाल्याने विकासकामे सुरू झाली नाही याबाबत विचारले यावेळी मुख्याधिकारी यांनी आचारसंहितेचे कारण सांगीतले. कोर्ले सातंडी येथून प्रस्तावित केलेल्या नळयोजनेमध्ये प्रमुख अडसर असलेला पाणी आरक्षणाचा प्रश्न सुटला.आरक्षण दाखला मिळूनही सहा महिने होवून गेले तरी न.पं.कडून पुढील हालचाल करण्यात आली नाही यामुळे नळयोजनेचा निधी मंजूर होणे आदी पुढील कार्यवाही होवू शकली नाही अशी माहिती मजिप्राकडून आपणाला देण्यात आली असे साळसकर यांनी सांगीतले.टाकी बांधण्याचा जागा अद्याप निश्चित झाल्या नाहीत याकडे त्यांनी लक्ष वेधले.जागांचा प्रश्न अद्यापपर्यंत का झाला नाही असा प्रश्नही साळसकर यांनी उपस्थित केला.पाणी हा देवगड जामसंडेमधील नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असून त्याकडे सत्ताधारी व विरोधी नगरसेवक दुर्लक्ष करीत आहेत.केवळ श्रेयवाद व टक्केवारी यासाठी त्यांच्यामध्ये वाद सुरू आहे व या वादात जनतेचे मात्र हाल होत आहेत ही स्थिती साळसकर यांनी मुख्याधिकारी यांच्यासमोर मांडली व नळयोजना साठवण टाकींच्या जागेचा प्रश्न दहा दिवसात सोडवा.निधी मंजुर करून देण्यात येईल असे सांगीतले.शहरातील कचèयाचा प्रश्न, सांडपाणी प्रश्न गंभीर आहेत.त्याचबरोबर न.पं.हद्दीतील खुल्या क्षेत्रांची सातबारा नोंदीप्रमाणे रीतसर नोंदणी करून ही खुली क्षेत्रे न.पं.च्या मालकीची आहेत असे फलक त्या परिसरात लावण्यात यावेत व ज्या क्षेत्रात अतिक्रमणे आहेत ती तात्काळ हटविण्यात यावीत अशी मागणी केली.देवड सडा वारवी(खरी) या ठीकाणी तलावाची निर्मिती यापुर्वी करण्यात आली आहे.या तलावाची दुरूस्ती करून त्या पाण्यावरून लघुनळयोजनेची निर्मिती करण्यात यावी.देवगड जामसंडे न.पं.हद्दीमध्ये मंजुर होवून प्रलंबित विकासकामे अद्याप रखडलेली आहेत.या मंजुर कामांची निविदाप्रक्रिया होवून संबंधित मक्तेदारांकडून अनामत रक्कम भरून अद्यापही कार्यारंभ आदेश दिलेले नाहीत त्याबाबत तात्काळ कार्यवाही व्हावी अशी मागणी साळसकर यांनी केली.मक्तेदारांची बीड कॅपॅसीटी प्रशासनाकडून तपासणी केली नसल्याचे निदर्शनास आले आहे.त्याबाबतची माहिती साळसकर यांनी मागीतली यावेळी त्याबाबतची तपासणी करतो व माहिती देतो असे मुख्याधिकारी यांनी यावेळी सांगीतले मात्र बीड कॅपॅसीटी केली नसेल तर त्या कामाचे टेंडर रद्द करून नवीन टेंडरप्रक्रिया राबवावी अशी मागणी साळसकर यांनी केली.
