सावंतवाडी (प्रतिनिधी)
क्रेडाई महाराष्ट्रच्या कार्यकारिणीवर नीरज देसाई यांची सलग तिसऱ्यांदा निवड
बांधकाम व्यावसायिकांची देशपातळीवरील सर्वात मोठी आणि प्रभावी संघटना असलेल्या ‘क्रेडाई’ च्या (CREDAI – Confederation of Real Estate Developers’ Associations of India) महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीवर युडी -टिपी (म्युनिसिपल कॉऊन्सिल, प्लॉटिंग, बीपीएमएस) को-कव्हेनिअर म्हणून क्रेडाई सावंतवाडीचे अध्यक्ष नीरज देसाई यांची २०२५-२७ कार्यकालासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे तळ कोकणातील व्यवसायीकाला राज्यस्तरीय मंचावर सलग ६ व्या वर्षी प्रतिनिधित्व मिळाले आहे.
