कणकवली (प्रतिनिधी)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाही कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार थकणार नाही ; पालकमंत्री नितेश राणे यांचे कर्मचाऱ्यांना आश्वासन
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाही कंत्राटी कर्मचाऱ्याला पगारापासून वंचित राहावे लागणार नाही. कोणत्याही कर्मचाऱ्यांचे पगार थकणार नाहीत. थकीत असलेले पगार लवकरच अदा केले जातील असे आश्वासन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी दिले. कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कणकवली येथे पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली व आपल्या मागण्या आणि अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या त्यावेळी ‘काळजी करू नका कोणावरही अन्याय होऊ देणार नाही’ असे आश्वासन दिले.
