खारेपाटण गावचा सुपुत्र अथर्व अवधूत गोडवे याचे कला क्षेत्रामध्ये उत्तुंग यश

0 minutes, 1 second Read

 

 

कणकवली ( प्रतिनिधी)

खारेपाटण गावचा सुपुत्र अथर्व अवधूत गोडवे याचे कला क्षेत्रामध्ये उत्तुंग यश

अथर्वअवधूत गोडवे याने कला क्षेत्रातील UCEED या देशव्यापी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये संपूर्ण देशात 30 वां क्रमांक प्राप्त केला आहे.कोल्हापूर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी येथून असे यश प्राप्त करणारा पहिलाच विद्यार्थी.या यशामुळे अथर्व ला IIT मुंबई, दिल्ली, हैद्राबाद तसेच अनंत अंबानी कॅम्पस अहमदाबाद येथे पुढील शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे.

कोरोना काळात स्वकर्तृत्वावर कला क्षेत्रामध्ये दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या अथर्वने 10 वीच्या परीक्षेत 93% गुण प्राप्त करून शालेय शिक्षणात ही कौतुकास्पद यश मिळवले परंतु आर्ट, ड्रॉइंग ची प्रचंड आवड असल्याने तेच आपले करिअर निवडून कोल्हापूर येथे BRDS मध्ये पदविका शिक्षण पूर्ण केले. या कालावधी मध्ये अथर्वचे 2 वेळा मुंबई येथे आर्ट गॅलरी मध्ये पोर्ट्रेट झळकले. आणि त्यानंतर मुंबई व गोवा येथे झालेल्या पदवी प्रवेश परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केले.देशभरात 30 व क्रमांक प्राप्त केलेल्या अथर्वचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *