दिविजा सातपुते, लीना धुरी, श्रेया मांजरेकर, शर्वरी पाटील, अनुष्का कदम, अनिता आळवे गटानुक्रमे प्रथम

0 minutes, 3 seconds Read

 

 

 

 

मालवण (प्रतिनिधी)

दिविजा सातपुते, लीना धुरी, श्रेया मांजरेकर, शर्वरी पाटील, अनुष्का कदम, अनिता आळवे गटानुक्रमे प्रथम

ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग आणि ग्लोबल रक्तविरांगना मालवणच्या वतीने आयोजन

महिला दिनानिमित्त ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग आणि ग्लोबल रक्तविरांगना मालवणच्या वतीने रविवारी महिलांसाठी आयोजित केलेल्या ग्लोबल रक्तविरांगना मिनी मॅरेथॉन स्पर्धेत दिविजा संदीप सातपुते, लीना नरेश धुरी, श्रेया सागर मांजरेकर शर्वरी महादेव पाटील, अनुष्का नागेश कदम, अनिता आळवे यांनी प्रथम क्रमांक पटकावीला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली महिलांसाठीची मॅरेथॉन स्पर्धा असलेल्या या स्पर्धेचे यावर्षी तिसरे वर्ष होते. मालवण देऊळवाडा येथून सागरी महामार्ग ते कोळंब पूल असा या मॅरेथॉनचा मार्ग होता. देऊळवाडा येथे या स्पर्धेचे उदघाटन गतवर्षीच्या ज्येष्ठ गटातील विजेत्या सौ. वैशाली प्रभूझाट्ये यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे – १० ते १५ वर्षे वयोगट (२ किमी)- १. दिविजा संदीप सातपुते, २. महिमा विशाल मोहिते, ३. हर्षाली सत्यवान वेंगुर्लेकर, ४. धनश्री प्रशांत परब, ५. गार्गी संदेश पाडगावकर १६ ते २५ वयोगट (२ किमी)- १. लीना नरेश धुरी, २. मेघा प्रमोद सातपुते, ३. रेश्मा रावबा पांढरे, ४. तृप्ती शरद माडये, ५. दिक्षा देवू झोरे, २६ ते ३५ वयोगट (२किमी)- १. श्रेया सागर मांजरेकर, २. गीतांजली चंद्रकांत चव्हाण, ३. पद्मिनी प्रकाश मयेकर, ४. आराध्या प्रसाद गवंडी, ५. स्नेहल विष्णू ढोके. ३६ ते ४५ (२ किमी)- १. शर्वरी महादेव पाटील, २. चंद्रकला प्रमोद सातपुते, ३. नीलम प्रसन्न मयेकर, ४. प्रेरमा देवेंद्र लोहार ५. अक्षता अनंत कोपकर. ४६ ते ५५ वयोगट (चालणे, धावणे दोन्ही, २ किमी)- १. अनुष्का नागेश कदम, २. अस्मिता संजय रावराणे, ३. बितौज जॉन फर्नांडिस, ४. दिपाली दिलीप शिंदे, ५. दीपिका दिलीप वाईरकर ५६ वर्षा पुढील महिला चालणे, धावणे दोन्ही, २ किमी) – १. अनिता आपा आळवे, २. अमृता वेझरे, ३. वैशाली प्रभूझाट्ये, ४. ज्ञानज्योती बिनसाळे, ५. मीना फर्नाडिस.

प्रत्येक गटातील प्रथम पाच क्रमांकाच्या विजेत्या महिलांना आकर्षक चषक, मेडल व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्तेजनार्थ क्रमांकांना पारितोषिके देण्यात आली. सहभागी सर्व स्पर्धकांना सन्मानपत्र व मेडल देण्यात आले. स्पर्धेचे पंच म्हणून रेनॉल्ड बुतेलो, बंटी केरकर यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन अजय शिंदे यांनी केले. यावेळी ग्लोबल रक्तदाते व ग्लोबल रक्तविरांगना समूहाचे सर्व सदस्य, स्वयंसेवक उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *