मधली तोंडवळीस उधाणाचा फटका शासकीय यंत्रणेकडून नुकसानीची पहाणी
रविवारी आलेल्या उधाणाचा फटका मधली तोंडवळी भागास बसून सुमारे तीन हेक्टर ६८गुंठे क्षेत्रावरील बागायती क्षेत्र बाधीत झाले आहे.याबाबत गुरुवारी शासकीय यंत्रणेकडून पहाणी करत नुकसानीची नोंद करण्यात आली. रविवारी आकस्मिक आलेल्या उधाणामुळे तोंडवळी मधली भागात उधाणाचे खारे पाणी माड,काजू,फोफळ बागायतीत शिरल्याने फळबागायतींना धोका निर्माण झाला होता.याबाबत गुरुवारी ग्राममहसूल अधिकारी एम एच शिरसाट,कृषी सहाय्यक धाकोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची नोंद केली.यात राम पेडणेकर,अशोक पेडणेकर,सुर्याजी पाटील,माधवी पेडणेकर, सुभाष पेडणेकर, संतोष तोंडवळकर,मंगेश तोंडवळकर,राजन तोंडवळकर,संदिप पाटील, मिलिंद पाटील, अनिल पाटील, रविंद्र पाटील, रसिकराज नाईक, गोविंद पेडणेकर, आदी ग्रामस्थांच्या काजू,माड,फोफळी,केळी बागायतीत उधाणाचे खारे पाणी शिरल्याने सुमारे तीन हेक्टर ६८गुंठे क्षेत्रावरील बागायती धोक्यात आली आहे.