तब्बल १३ वर्षांनी,  श्रीदिर्बा-रामेश्वर व श्रीगणपती भेटीचा सुवर्णमय सोहळा हजारो भाविकांनी याची देही याची डोळा अनुभवला.

देवगड : प्रतिनिधी

तब्बल १३ वर्षांनी,  श्रीदिर्बा-रामेश्वर व श्रीगणपती भेटीचा सुवर्णमय सोहळा हजारो भाविकांनी याची देही याची डोळा अनुभवला.

गुरूवारी पारंपारिक मार्गावरून ढोलताशांच्या गजरात रयतेसह किल्ला येथे गणपतीभेटीला निघालेला देवगड जामसंडे गावचे ग्रामदैवत श्रीदिर्बादेवी रामेश्वर देवस्वारीचे स्वागत फटाक्यांचा आतषबाजीत व नामघोषात करण्यात आले. तब्बल १३ वर्षांनी श्रीदिर्बा-रामेश्वर व श्रीगणपती भेटीचा सुवर्णमय सोहळा हजारो भाविकांनी याची देही याची डोळा अनुभवला. गणपतीभेटीला निघालेल्या ग्रामदैवतांच्या आगमनाने शहरवासिय भक्तजन आनंदीत झाला.

 

 

तब्बल १३ वर्षांनी देवगड जामसंडेसह बारा वाड्यांचे बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्रीदिर्बादेवी व श्रीरामेश्वर देवस्वारी गुरूवारी सकाळी श्री दिर्बादेवी मंदीर येथून किल्ला येथील श्रीगणेशाच्या भेटीसाठी निघाल्या. ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांचा आतषबाजीत ग्रामदैवतांच्या नामघोषात रयतेसह देवस्वाऱ्या पारंपारिक मार्गावरून मार्गक्रमण करताना ठिकठिकाणी शहरवासिय भाविकांनी आपल्या ग्रामदैवतांचे स्वागत केले.देवगड ब्राम्हणदेव मंदीर येथे भेट घेवून तसेच भाविकांच्या ओट्या व दर्शन घेतल्यानंतर देवस्वात्यांनी  काही वेळ विश्रांती घेवून किल्ला येथे गणेशभेटीसाठी प्रस्थान केले. देवस्वाऱ्या जाणाऱ्या  मार्गावर स्वच्छता मोहिम राबवुन आकर्षक रांगोळ्यांची सजावट, विद्युत रोषणाई करण्यात आली होती.तब्बल १३ वर्षांनी श्रीदिर्बादेवी रामेश्वर व श्रीगणेश भेटीचा सुवर्णमय क्षण हजारो भाविकांना याची देही याची डोळा अनुभवला.

श्रीगणेशभेटीनंतर महाप्रसाद व विश्रांती घेवून पुन्हा देवगड किल्ला गणपती मंदीर मुख्य बाजारपेठ, एस्टी स्टँड मार्गे जामसंडे दिर्बादेवी मंदीराकडे परतीच्या प्रवासाला निघाल्या.यावेळी ठिकठिकाणी ग्रामस्थ, भाविकांनी ग्रामदैवतेचे ओट्या भरून दर्शन घेतले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *