कणकवली व देवगड तालुक्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
जिल्हाप्रमुख संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी विविध ठिकाणी शिवजयंतीला दिली भेट
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपुर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्सहात साजरी करण्यात येते. यावेळी शिवजयंती उत्सव समिती, कलमठ, छत्रपती शिवाजी महाराज नगर, कणकवली पटवर्धन चौक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने शिवजयंती साजरी, सकल मराठा समाज-कणकवली, मावळे आम्ही स्वराज्याचे, नांदगाव, शिरगांव, वाडा व पडेल येथील शिवजयंतीला जिल्हाप्रमुख संदेश पारकर व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी भेट देत छत्रपती शिवाजीनगर महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मावळे आम्ही स्वराज्याचे यांच्या वतीने नांदगाव येते जिल्हाप्रमुख संदेश पारकर हस्ते शिवध्वज फडकवण्यात आला. शिवरायांचे आचार विचार जोपासणे व त्यांनी शिकवलेल्या संस्कृती चे पालन करणे ही काळाची गरज आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर, आदित्य सापळे, प्रसाद अंधारी, राजू शेट्ये, उत्तम लोके, राजू राणे, संकेत नाईक, गुरु पेडणेकर, रुपेश आमडोस्कर, तेजस राणे, महेश कोदे, किरण वर्दम, सौरभ पारकर, कौशिक पारकर, कलमठ येथे राजू राठोड, अनुप वारंग, धीरज मेस्त्री, बाळू मेस्त्री, विलास गुडेकर, वैदेही गुडेकर, शिवाजीनगर येथे राजेंद्र वर्णे, दिवाकर मुरकर, उमेश वाळके, सोहम वाळके, नांदगाव येथे राजा म्हसकर, आबू मेस्त्री, व मावळे आम्ही स्वराज्याचे सर्व कार्यकर्ते, शिरगांव येथे देवगड तालुका प्रमुख रवींद्र जोगल, अमित साळगावकर, अजित सावंत, वाडा येथे यदु ठाकूर देसाई, शशांक वाडेकर, जयदीप तिर्लोटकर, सुहास वाडेकर, व मणचे येथे तरुण उत्कर्ष मंडळ मणचे येथील कार्यकर्ते व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.