बांदा (मंगल कामत)
गोगटे वाळके महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती संपन्न
बांदा येथील गोगटे वाळके महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागांतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा . आरोंदेकर यांनी सावित्रीबाई फुले यांचे स्त्री विषयक विचार मांडले .त्यांच्या जीवन प्रवासाचा आढावा घेत असताना फुले दांपत्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी केलेले प्रयत्न, समाजातील अनिष्ट रूढींना केलेला विरोध तसेच साहित्य निर्मितीतील त्यांचे योगदान याविषयी आपले मत मांडले तसेच सावित्रीबाईंच्या त्यागाचा ,त्यांच्या प्रयत्नांचा आजच्या मुलींनी लाभ घ्यावा तरच सावित्रीबाई यांना खरी श्रद्धांजली असेल असेही म्हटले.
या जयंतीच्या निमित्ताने ग्रंथ विभागातर्फे प्रा.डॉ. अनिल शिर्के यांनी विविध ग्रंथांचे प्रदर्शन भरवले होते त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना विविध ग्रंथांचा परिचय झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. एन. डी. कार्वेकर होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण प्रसंगांना उजाळा दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. न्हावेलकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. रमाकांत गावडे यांनी आणि आभार प्राध्यापक प्रसाद जाधव यांनी मानले.
