सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त जामसंडे बुद्धविहार येथे आयोजित अभिवादन कार्यक्रम
सावित्रीबाई फुले यांचे चरित्र म्हणजे समाजाला अज्ञानमय अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा एक दिशादर्शक मार्ग आहे, असे प्रतिपादन सम्यक प्रबोधिनी जामसंडे (मुंबई) गाव शाखेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जामसंडे बुद्धविहार येथे ३ जानेवारी २५ रोजी सायंकाळी आयोजित अभिवादन कार्यक्रमात मंडळाच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख व वक्त्या सोनाली जाधव यांनी केले. त्यापुढे म्हणाल्या, विधवा स्त्रियांचे केशवपन, सती प्रथा, बालविवाह या प्रथेला सावित्रीबाई फुले यांनी जोरदार विरोध केला मात्र विधवा पुनर्विवाह या सामाजिक सुधारणाच्या त्या पुरस्कर्त्या झाल्या. यावेळी माजी अध्यक्ष एम. के. जामसंडेकर, माजी अध्यक्ष पूजा जाधव, नगरसेविका मनिषा जामसंडेकर, अध्यक्ष विलास जाधव व बालवक्त्या उर्वशी सचिन कदम यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जीवनाचा धावता आढावा घेताना समस्त महिला वर्गासाठी सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे कवाडे खुली केली म्हणूनच आज देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत स्त्री पोचू शकली असे सांगताना प्रत्येक स्त्री सावित्रीबाई फुले यांची कृतज्ञ असले पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सचिव राजेंद्र जाधव यांनी आपल्या ओघवत्या भाषाशैलीत केले.