संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यानी हयात दाखले वेळेत सादर करावेत – तहसीलदार दीक्षांत देशपांडे 

0 minutes, 0 seconds Read

संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यानी हयात दाखले वेळेत सादर करावेत – तहसीलदार दीक्षांत देशपांडे 

संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्याना अर्थ सहाय्य वितरणाबाबत आवाहन

 

कणकवली दि २२ जुलै (तुळशीदास कुडतरकर)

संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्याना अर्थ सहाय्याचे वितरण लाभार्थ्यांना यापुढे डी.बी. टी. पद्धतीने होणार आहे. म्हणजेच सदर योजनेचे लाभ थेट लाभ हस्तातरण प्रक्रिया द्वारे करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रत्येक लाभार्थ्यांची माहिती डी.बी.टी.पोर्टल वर भरण्याचे काम तहसीलदार कार्यालय कणकवली येथे सुरू आहे.

तरी कणकवली तालुक्यातील संजय गांधी/श्रावण बाळ योजनेतील ज्या लाभार्थ्यांनी अद्यापही हयात प्रमाणपत्र तहसीलदार कायार्लयात सादर केलेले नाही त्यांनी तात्काळ तलाठी यांच्याकडून हयात प्रमाणपत्र घेऊन त्यावर बॅक अधिका-यांची स्वाक्षरी तसेच त्यासोबत आधार कार्ड व बँक पासबुक झेरॉक्स, अपंग असल्यास प्रमाणपत्र झेरॉक्स जोडून तहसीलदार कार्यालय कणकवली येथे २५ जुलै २०२४ पर्यंत सादर करावयाचे आहे. तसेच प्रत्येक लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याशी आधार क्रमांक सलग्न करून घ्यावे तसेच वेळेत हयात दाखले सादर करावेत असे आवाहन तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *