कट्टा कॉर्नर येथे गर्दीचा फायदा घेत पाकीट चोरणाऱ्या परप्रांतीय युवकाला ग्रामस्थांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात 

 

बांदा (प्रतिनीधी)

कट्टा कॉर्नर येथे गर्दीचा फायदा घेत पाकीट चोरणाऱ्या परप्रांतीय युवकाला ग्रामस्थांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात 

आज सोमवार आठवडा बाजारात कट्टा कॉर्नर येथे गर्दीचा फायदा घेत पाकीट चोरणाऱ्या परप्रांतीय युवकाला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. चार युवकांची टोळी बाजारात फिरत होती, मात्र एकाला ताब्यात घेतल्यानंतर इतरांनी तेथून पळ काढला. बांदा पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत त्यांना सोडून दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी दिली.

आज आठवडा बाजारात खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. गर्दीचा फायदा घेत परप्रांतीय युवकांची टोळी चोरीच्या उद्देशाने फिरत होती. कट्टा कॉर्नर बाजारपेठेत ग्राहकाच्या खिशातून पाकीट चोरी करताना या परप्रांतीय युवकाला मनसेचे सावंतवाडी तालुका प्रमुख मिलिंद सावंत व युवा उद्योजक विकी कदम यांनी रंगेहाथ पकडले. त्याला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली.यावेळी त्याच्या टोळीतील इतर तिघा युवकांना शोधण्यासाठी शोधमोहीम राबविण्यात आली, मात्र त्यांनी पलायन केले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *