सिंधू रत्न योजनेतून दशावतार मंडळांना वाहन वाटप,जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी केल्या चाव्या सुपूर्त

 

सिंधुदूर्गनगरी (प्रतिनीधी)

सिंधू रत्न योजनेतून दशावतार मंडळांना वाहन वाटप,जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी केल्या चाव्या सुपूर्त

सिंधुरत्न योजनेअंतर्गत सिंधुदुर्गातील नाट्यमंडळींना मंजूर झालेल्या ९ वाहनांच्या चाव्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते दशावतार नाट्यमंडळांकडे सुपूर्त करण्यात आल्या.

माजी मंत्री दिपकभाई केसरकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या शासनाच्या सिंधुरत्न योजनेअंतर्गत दशावतार नाट्यमंडळांना वाहन खरेदीसाठी ७५% अनुदान शासनाकडून मंजूर करणेत आले होते व उर्वरित २५% कर्ज जिल्हा बँकेकडून दिले होते. अनुदान मिळेपर्यंत संपूर्ण कर्ज रक्कम बँकेने विनातारण १५ नाट्यमंडळांना मंजूर केली होती, त्यापैकी ९ वाहने जिल्ह्यामध्ये नोंदणीकृत झाली असून त्यांच्या चाव्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालय ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे नाट्यमंडळांच्या मालकांना सुपूर्त करण्यात आल्या.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, बँकेचे संचालक विठ्ठल देसाई, प्रकाश बोडस, रविंद्र मंडगावकर, महेश सारंग, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे तसेच संदेश उर्फ गोट्या सावंत,सिंधूरत्नचे डॉ. आनंद तेंडुलकर, जिल्हा परिषद अधिकारी महोदव शिंगाडे व भालचंद्र माळवदे, बँकेचे अधिकारी व कर्मचारी आणि दशावतार नाट्यमंडळाचे मालक व कलाकार उपस्थित होते.

बँकेने केलेल्या सहकार्यामुळे जिल्ह्यातील नाट्यमंडळांना नवीन वाहने उपलब्ध होऊ शकली, याबद्दल नाट्यमंडळांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे तसेच अनुदान बद्दलम माजी मंत्री दीपक केसरकर व शासनाचे आभार मानले.

यावेळी वालावलकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, बाळकृष्ण गोरे पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, चेंदवणकर गोरे पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, पार्सेकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, आरोलकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, आजगावकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, नाईक मोचेमाडकर पारंपारिक दशावतार लोकनाट्य मंडळ, मामा मोचेमाडकर पारंपरिक दशावतार लोकनाट्य मंडळ आणि खानोलकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ या दशावतार नाट्यमंडळाना वाहने सुपूर्त करण्यात आली. या सर्व नाट्यमंडळींनी सर्वांचे शतशः आभार मानले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *