मराठीतील ज्येष्ठ लेखक आणि संगीतकार डॉक्टर भा. वा. आठवले कालवश ; वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

 

देवगड (प्रतिनीधी)

मराठीतील ज्येष्ठ लेखक आणि संगीतकार डॉक्टर भा. वा. आठवले कालवश ; वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठीतील ज्येष्ठ लेखक आणि संगीतकार डॉ भा. वा. आठवले यांचे वयाच्या ९५ व्या निधन झाले. गुरुवार 19 डिसेंबर रोजी सकाळी सव्वा पाच वाजता त्यांचे निधन झाले.

13 हून अधिक  कादंबऱ्या , अनेक मराठी पुस्तके, आणि हजारो लेखांच्या माध्यमातून साहित्याला समृद्ध करणाऱ्या डॉक्टर भा. वा. आठवले यांच्या निधनाने साहित्यविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

रूढ अर्थाने त्यांनी चरितार्थासाठी वैद्यकीय व्यवसाय केला, मात्र संगीत आणि साहित्य हेच त्यांचे खरे जीवनविश्व होते.

संगीत क्षेत्रात त्यांनी अनेक रागांची निर्मिती करून भारतीय शास्त्रीय संगीत समृद्ध केले. भा. वा. आठवले हे एक उत्कृष्ट हार्मोनियम वादक देखील होते.

त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी रोहिणी, वैद्यकीय व्यावसायिक व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते  डॉ. सुनील आठवले, सुनबाई डॉ.मंजुषा, नातू डॉक्टर तन्मय, नातसून आणि इतर परिवार आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *