कणकवली रेल्वेस्थानक सौंदर्यीकरणाची मुलांना भुरळ ; शैक्षणिक सहलींचीही वाढली वर्दळ

 

कणकवली (प्रतिनिधी)

कणकवली रेल्वेस्थानक सौंदर्यीकरणाची मुलांना भुरळ ; शैक्षणिक सहलींचीही वाढली वर्दळ 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने कणकवली रेल्वेस्टेशनसह सिंधुदुर्गनगरी, कुडाळ आणि सावंतवाडी या रेल्वेस्थानकांच्या परिसरांचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. सिंधुदुर्गच्या मध्यवर्ती असलेल्या कणकवली रेल्वेस्थानकाचा परिसर तर पर्यटकांसह सर्वांचेच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्यामुळे सायंकाळच्यावेळी कणकवली रेल्वेस्थानक परिसरात लोकांची वर्दळ वाढली असून शनिवारी शाळकरी मुलांच्या शैक्षणिक सहलीनिमित्त या परिसराला मुलांनी भेट दिली. तेथील बालोद्यान, सेल्फी पॉईंट, वन्यप्राण्यांचे स्टॅच्यू आणि एकूणच परिसराचे सुशोभिकरण पाहून मुलांचा आनंद द्विगुणित झाला.

 

 

सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली यांच्यामार्फत कणकवली आणि सिंधुदुर्गनगरी रेल्वेस्थानक परिसरातील सुशोभिकरणाची देखभाल केली जात आहे. वेळच्यावेळी झाडांना पाणी आणि साफसफाई देखील केली जात आहे. कणकवली रेल्वेस्टेशन हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. हे ठिकाण आता पर्यटन केंद्र म्हणून विकसित होत आहे. तेथील बालोद्यानात तर दिवसभर बच्चेकंपनींची धमाल सुरु असते. विस्तीर्ण पार्किंग सुविधा, दोन्ही बाजूने हिरवीगार झाडे, मध्ये असलेला सेल्फि पॉईंट,
वन्यप्राण्यांचे आकर्षक स्टॅच्यू, जिल्हयातील पर्यटनस्थळांची फोटोसह माहिती यामुळे कणकवली रेल्वेस्थानक परिसर हायटेक बनला आहे.

 

 

 

सायंकाळच्या सत्रात प्रवाशांबरोबर इतरही लोकांची या परिसरात वर्दळ असते. आता विद्यार्थी वर्गाच्या शैक्षणिक सहलीही या पर्यटन स्थळाला भेटी देवू लागल्या आहेत. सा.बां. चे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सौंदर्याकरण आणि देखभालीमुळे सा.बां. चे कौतुक होत.

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *