सावंतवाडी (प्रतिनीधी)
विजेचा शॉक लागून युवकाचा मृत्यू ; माडखोल येथील घटना माणगाव महादेवाचे किरवडे येथील रुपेश डांगे असे आहे युवकाचे नाव
माडखोल खळणेवाडी येथे वीज खांबावरील इन्सुलेटरचे काम करण्यासाठी कंत्राटदाराचा कामगार पोलावर चढला असता त्याला अचानकपणे शॉक लागल्याने तो पोलावरून खाली कोसळला. त्या वेळी घटनास्थळी असणारे त्याचे सहकारी कर्मचारी यांनी अधिक उपचारासाठी त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
उपचारात दरम्यान त्याचे दुःखद निधन झाले. रुपेश प्रकाश डांगे असे युवकाचे नाव असून सदरचा युवक हा कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील महादेवाचे किरवडे येथील असल्याचे समजते. पोलीस पुढील तपास करत आहेत.
