कणकवली दि ३ नोव्हेंबर (तुळशीदास कुडतरकर)
परमहंस भालचंद्र महाराज यांचा बुधवार ४ डिसेंबर पासून ४७ वा पुण्यतिथी महोत्सव ! ८ डिसेंबर पर्यंत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम;तयारी पूर्ण
परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ४७ व्या पुण्यतिथी महोत्सवाला ४ डिसेंबर पासून पहाटे काकड आरतीने प्रारंभ होणार आहे. ८ डिसेंबर पर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आश्रमात होणार आहेत. या उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. मुंबई,पुणे तसेच इतर भागातील भाविक कणकवलीत उत्सवाच्या निमित्ताने दाखल झाले आहेत.
४ डिसेंबर पासून पहाटे ५.३० वाजता समाधीपूजन, काकडआरती, सकाळी ८.३० ते १२.३० सर्वभक्त कल्याणार्थ धार्मिक विधी -भालचंद्र महारूद्र महाभिषेक अनुष्ठान, दुपारी १२.३० ते १ आरती, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, ४ वाजेपर्यंत भजने, सायंकाळी ४ ते ७.३० वाजेपर्यंत कीर्तन महोत्सव, रात्री ८ वाजता दैनंदिन आरती असे कार्यक्रम होणार आहेत.
