कणकवली (तुळशीदास कुडतरकर)
सांघिक प्रचार सुरू असल्याने आ. नितेश राणे यांना मोठे मताधिक्य मिळणार – शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वर्षा कुडाळकर यांची माहिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती म्हणून आम्ही एकत्रित प्रचार करत आहोत. कणकवलीत आम. नितेश राणे यांचा प्रचार सर्वत्र आम्ही करीत आहोत. त्यामुळे कणकवलीत आ. नितेश राणे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशी माहिती शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वर्षा कुडाळकर, उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत यांनी दिली. कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख मेहुल धुमाळे, उपतालुकाप्रमुख दामू सावंत, सुनील सावंत, महिला उपजिल्हा प्रमुख सरिता राऊत, महिला तालुकाप्रमुख प्रिया टेंबकर, शोभा बागवे, फोंडाघाट सरपंच संजना आग्रे आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वर्षा कुडाळकर म्हणाल्या, महायुतीच्या सरकारने लाडकी बहिण योजना, लखपती दीदी योजना यासह विविध महिलांसाठी योजना राबवल्या त्यामुळे चांगला प्रतिसाद सर्वत्र मिळत आहे.देवगड तालुक्यात झालेल्या महिला मेळाव्यात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. यावेळी कणकवली तालुक्यातील साळीस्ते, खारेपाटन, बिडवाडी, बोर्डवे, कणकवली व विविध गावांम महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच महिलांना नवी नियुक्ती देण्यात आली. नुतन पदाधिका-यांना पुढील वाटचालीसाठी वर्षा कुडाळकर यांनी शुभेच्छा दिल्या.
