काँग्रेस महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रचारादरम्यान राहुल गांधीच्या आरक्षण संपविण्याच्या विधानाचा जाब विचारावा – आमदार नितेश राणे

0 minutes, 0 seconds Read

कणकवली (तुळशीदास कुडतरकर)

 

काँग्रेस महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रचारादरम्यान राहुल गांधीच्या आरक्षण संपविण्याच्या विधानाचा जाब विचारावा – आमदार नितेश राणे

 

आरक्षण बचाव रॅलीमध्ये हजारो बहुजन बांधव उतरले रस्त्यावर ; जय हिंद जय भीम म्हणत आमदार राणेंनी वेधले सर्वांचे लक्ष

गांधी घराण्याचे वारस काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षण विरोधी केलेल्या विरोधानंतर त्यांची दखल देशात घेणे गरजेचे आहे .काँग्रेसने कायमच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अन्याय केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आरक्षणाचे संरक्षण करायला समर्थ आहेत. आरक्षण विरोधी बोलणाऱ्या काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे जे नेते उद्या प्रचाराला येतील त्यांनी राहुल गांधींच्या आरक्षण संपविण्याच्या विधानाचा जाब विचारावा असे आवाहन भाजप प्रवक्ते तथा आमदार नितेश राणे यांनी करत जय हिंद जय भीम चा नारा देत आंबेडकरी जनतेची मने जिंकली.

कणकवली येथे महायुती व आरपीआय यांच्या संयुक्त विद्यमाने संविधानाच्या रक्षणासाठी आयोजित केलेल्या आरक्षण बचाव रॅलीत दरम्यान त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत आरपीआय जिल्हाध्यक्ष रमाकांत जाधव भाजपा एससी मोर्चा जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव , भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, भाजप प्रवक्ते अंकुश जाधव, सदाशिव ओगले, संतोष किंजवडेकर, नवलराज काळे,अजित कांबळे,मनोज रावराणे, शारदा कांबळे,संतोष कानडे, पंढरी चव्हाण आदि उपस्थित होते.

आमदार नितेश राणे पुढे म्हणाले की मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला माहिती असायला हवी की कोणत्या विचारात कोणत्या विचारला आपण मतदान करत आहोत राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षण विरोधी विधान केले. तेच जर पंतप्रधान मोदी यांच्याकडून झाले असते तर आज देशभरात गावागावात वाड्यावस्त्यांवर भाजपा आणि मोदींविरोधी रान उठवले असते. लोकसभा निवडणुकी वेळी भाजपा आरक्षण रद्द करणार आणि संविधान बदलणाऱ्या वावड्या उठून बहुजन समाजाला फसवलं गेलं. जर मोदींकडे ४०० पारचे बहुमत असते तर देशाच्या प्रगतीसाठी दबाबाशिवाय निर्णय घेता आले असते. आज २४० खासदार असलेल्या भाजपला विरोधकांच्या दबावाचा सामना करावा लागत आहे.भाजपाचे सरकार आल्यावर संविधान बदलणाऱ्या फसव्या प्रचारावेळी मतदाराने त्यांचा पुरावा मागितला नाही. मागासवर्गीय जनतेला आपण काही सांगितले तरी ते आपल्यावर विश्वास ठेवतात. त्यामुळे राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन आरक्षण संपविण्याची भाषा करतात. आरक्षण बचाव रॅलीतून घरी जाताना विचार करा की आरक्षणामुळे सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सभापती, नगरसेवक, नगराध्यक्ष, होण्याचा हक्क मागासवर्गीय जनतेला मिळाला आहे .जर आरक्षणाला आपण साथ दिली तर हे आरक्षण राहुल गांधी बंद करणार म्हणतात. जर राज्यात उद्या काँग्रेस विचाराचे सरकार आले तर आपले हक्काचे आरक्षण संपेल हे लक्षात घ्या.

देशातील संविधान राज्यघटना देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसने कायम पाण्यात पाहिले. कायम बाबासाहेब वर काँग्रेसने अन्याय केला. याउलट पंतप्रधान मोदी यांनी बाबासाहेबांच्या स्मृतीला आणि संविधानाला मोठे करण्याचे काम केले.

राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधात केलेले विधान आजवर नाकारले नाही. उद्या जेव्हा काँग्रेसवाले महाविकास आघाडीवाले प्रचाराला येतील तेव्हा त्यांना जनतेने विचारावे की आरक्षण रद्द करण्याच्या राहुल गांधीच्या भूमिकेचे काय ? आरक्षण बचाव रॅली काढण्यामागे मागासवर्गीय आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या जनतेमध्ये राहुल गांधींच्या आरक्षणाविरोधी भूमिकेबद्दल जनजागृती व्हावी हा उद्देश आहे. आज बौद्ध, चर्मकार, ठाकूर, धनगर, ओबीसी, मराठा समाजाचे नेते या रॅलीत सहभागी झाले आहेत. आज उघडपणे आरक्षण विरोधी बोलणाऱ्या काँग्रेसची सत्ता आली तर ते आरक्षण संपल्याशिवाय राहणार नाही असेही आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *