कणकवली, दि. 29 सप्टेंबर (तुळशीदास कुडतरकर)
तळेरे वाघाचीवाडी येथे नवरात्रौत्सवा निमित्त विविध धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन
तळेरे वाघाचीवाडी येथील श्री शेवरादेवी कला, क्रीडा, शैक्षणिक आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीने याहीवर्षी नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवारी (दि. 3 ऑक्टोबर) तळेरे वाघाचीवाडी येथे या देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल. आणि दररोज रास गरबा, दांडिया, फुगडी, वेशभूषा स्पर्धा, पैठणी असे कार्यक्रम होणार असून त्यांना वैयक्तिक बक्षिसे देण्यात येतील. तर अष्टमी दिवशी होम या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज देवीची पूजा, आरती आणि इतर कार्यक्रम रात्री उत्साहात साजरे केले जातात.
