पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सावंतवाडीत रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा ; विशाल परब  यांची संकल्पना

 

सावंतवाडी (प्रतिनिधी)

 

 पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सावंतवाडीत रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा ; विशाल परब  यांची संकल्पना

भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या संकल्पनेतून पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य व्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेवून मोफत रूग्णवाहिका दिल्या जाणार आहेत. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. मोती तलाव काठावर हा लोकार्पण सोहळा संपन्न होणार असून याची जय्यत तयारी सुरू आहे. युवा नेते विशाल परब यांनी कार्यक्रमस्थळी भेट देत पहाणी केली.

हा रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा 26 सप्टेंबर सायं ठीक 4 वाजता श्रीमंत शिवरामराजे भोसले पुतळा व केशवसुत कट्यानजिक, मोती तलाव, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत रूग्णवाहिका दिल्या जाणार आहेत.

मंत्री रविंद्र चव्हाण या कार्यक्रमाला उपस्थित रहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. यानिमित्ताने भव्य व्यासपीठ उभारण्यात आलं आहे. उद्या सायंकाळी हा लोकार्पण सोहळा संपन्न होणार असून याची जय्यत तयारी सुरू आहे. युवा नेते विशाल परब यांनी कार्यमस्थळी भेट देत पहाणी केली.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *