देवगड : प्रतिनिधी
न.पं.चे गणेशोत्सव नियोजन कागदावरच ; उबाठाचे सर्व नगरसेवक भ्रष्टाचारात बुडालेले – शरद ठुकरुल
भाजपा गटनेते शरद ठूकरूल व माजी नगराध्यक्ष योेगेश चांदोस्कर यांचा घणाघात
नगराध्यक्षांनी गणेशोत्सवापुर्वी न.पं.मध्ये बैठका घेवून केलेले नियोजन हे कागदावरच राहीले अशी टीका भाजपा गटनेते शरद ठुकरूल व माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांनी केली.उबाठाचे सर्व नगरसेवक हे भ्रष्टाचारात बुडालेले आहेत असा घणाघाती आरोप यावेळी त्यांनी केला.
आमदार संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकारपरिषदेत भाजपा गटनेते शरद ठुकरूल आणि माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांनी न.पं.च्या गणेशोत्सवापुर्वी बैठक घेवून केलेल्या नियोजनाचा पुरता पाढा वाचला. या पत्रकारपरिषदेला भाजपा शहरअध्यक्ष योगेश पाटकर, भाजयुमो शहरअध्यक्ष दयानंद पाटील हे उपस्थित होते.
न.पं.मध्ये गणेशोत्सवापुर्वी नियोजन बैठक झाली.यामध्ये अनेक प्रश्न मांडण्यात आले.मासळी विक्रेत्यांसाठी तात्पुरती व्यवस्था करून देतो असे नगराध्यक्षांनी सांगीतले. प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झाली नाही.मासळी विक्रेत्या महिला अद्यापही रस्त्याचा बाजुलाच बसत असून त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.पार्कींगचा पुरता बट्टयाबोळ उडाला.पार्कींगसाठी जागा निश्चित करण्यात आली व त्यानुसार पार्किंगचे फलक लावण्यात आले मात्र ते सुध्दा न दिसणारे अशा स्थितीत होते त्यामुळे पार्कींगची समस्या सुटली नाही.बहुतांशी ठिकाणी ग्रासकटरने गवत काढले गेलेच नाही.काही ठिकाणी स्टड्ढीटलाईट बंद,घंटागाडी वेळेवर नाही अशी स्थिती होती यामुळे गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही गणेशोत्सवापुर्वी केलेले नियोजन हे कागदारवर राहीले याबाबतची भुमिका नगराध्यक्षांनी स्पष्ट करावी असे आव्हान ठुकरूल आणि चांदोस्कर या द्वयींने केले.आम्ही न.पं.मध्ये विरोधातच आहोत मात्र आम्ही सत्तेत नाही असे म्हणणारे उबाठाचे नगरसेवक शहरातील प्रमुख समस्यांबाबत मुग गिळून गप्प का? असा सवाल चांदोस्कर यांनी केला.फक्त दुसèयांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे उबाठाचे नगरसेवक हे सर्व नगरसेवक भ्रष्टाचारात बुडालेले आहेत असा घणाघाती आरोप चांदोस्कर यांनी केला.
शहरातील प्रमुख असलेल्या कचरा व मासळी विक्रेत्यांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी लवकरच आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत बैठक घेणार असल्याचे चांदोस्कर यांनी यावेळी सांगीतले.
