तळेरे येथील महिपत वायंगणकर यांचे निधन

0 minutes, 0 seconds Read

तळेरे येथील महिपत वायंगणकर यांचे निधन

कणकवली दि २२ ऑगस्ट (प्रतिनिधी)

तळेरे येथील महिपत शंकर वायंगणकर यांचे अल्पशा आजाराने शनिवारी निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. जी जी या टोपण नावाने ते परिचित होते.

शिवसेना शिंदे गट कणकवली तालुका प्रमुख शरद वायंगणकर यांचे वडील आणि तळेरे ग्रामपंचायत सदस्या शर्वरी वायंगणकर यांचे ते सासरे होते.

त्यांच्या निधनानंतर तळेरे व्यापारी संघटनेने बंद पाळून श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्यावर रविवारी तळेरे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, सुना, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *