कणकवली (प्रतिनिधी)
देशभरात राबवल्या जाणाऱ्या ‘जल जीवन मिशन’ अभियानाचा एक भाग म्हणून, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन आणि पंचायत समिती कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने तळेरे येथे ‘जल जल्लोष’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
तळेरे ग्रामपंचायतीमार्फत आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात पार पडला आहे. ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनांचे महत्त्व आणि जल साक्षरता वाढवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये:
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात होईल,गावामध्ये पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी विशेष जल जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे तदनंतर जल जीवन मिशन योजनेअंतर्गत नूतन बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन यावेळी करण्यात येईल.तसेच गावच्या पाणी पुरवठ्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या ‘नळ जल मित्र’ व नळ कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार केला जाणार आहे.
उपस्थितांना ‘जल संवर्धन शपथ’ दिली जाईल आणि पारंपरिक पद्धतीने जल स्रोताचे पूजन केले जाईल.
या कार्यक्रमाला तळेरे परिसरातील सर्व ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तळेरे ग्रामपंचायतीने केले आहे.
