फणसगाव उपडाकघर येथे महिला कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान ; जागतिक महिला दिनाचे औचित्य

0 minutes, 0 seconds Read

 

कणकवली (प्रतिनिधी)

 

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात महिला घरासोबतच बाहेरील जबाबदाऱ्याही समर्थपणे पेलत आहेत. अनेक आव्हानांना आणि त्रासाला सामोरे जात त्यांनी यशाची शिखरे गाठली आहेत. याच कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून देवगड तालुक्यातील फणसगाव उपडाकघर येथे महिला कर्मचारी व महिला ग्राहकांचा सन्मान सोहळा पार पडला.

या कार्यक्रमाला सब पोस्ट मास्तर राजु तडवी, मुटाट शाखा डाकपाल पूर्वा बापट, पाटगांव शाखा डाकपाल प्रणाली घोणे, पोंभुर्ले शाखा डाकपाल विशाखा बाईत,सफाई कर्मचारी सौ.नाईक जीडीएस पॅकर सुरज ठुकरूल, राजाराम शिंदे, अंगद धगे यांसह आदि कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी उपस्थित जेष्ठ कर्मचार्यांच्या हस्ते महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. हा सन्मान स्वीकारताना महिला कर्मचारी भावूक झाल्या होत्या. सत्काराला उत्तर देताना पूर्वा बापट म्हणाल्या की, “प्रत्येक स्त्रीचा आदर आणि सन्मान हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता, तो वर्षाचे ३६५ दिवस घर आणि कामाच्या ठिकाणी राखला पाहिजे.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि नियोजन कार्यालयातील कर्मचार्यांनी केले. शेवटी सुरज ठुकरूल यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *