Oplus_16908288

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात छोटी मुलगी जखमी आचरा येथील घटना

0 minutes, 0 seconds Read

आचरा (प्रतिनिधी)

आचरे गावात मोकाट जनावरांसोबत भटक्या कुत्र्यांचाही प्रादुर्भाव वाढला असून मंगळवारी आचरा देवूळवाडी येथे भावासोबत शिमगा नृत्य बघायला गेलेल्या आठ वर्ष बालिकेची तीन कुत्र्यांनी पाठ धरल्याने तीला दुखापत होण्याची घटना घडली.जागृत नागरिकांनी धाव घेत भटक्या कुत्र्यांना हाकलल्याने पुढील अनर्थ टळला.मात्र वाढत्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव चिंतेचा विषय बनला आहे.याबाबत ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

 

आचरा देवूळवाडी येथे मंगळवारी सायंकाळी भावा सोबत गेलेल्या सचिन पुजारे यांच्या आठ वर्षांची मुलीवर भटक्या कुत्र्यांनी पाठलाग करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला.यावेळी गांगेश्वर मंदिरातजवळ उपस्थित असलेले युवक सुधीर घाडी, महेश बापर्डेकर,अभि बिडये,धोंडू घाडी,यांसह पंधरा ते वीस युवक तसेच श्रीकांत घाडी, विजय नलावडे, शशिकांत शेवरेकर,बाबल्या घाडी आदी ग्रामस्थांनी धाव घेत त्या तीन कुत्र्यांना हाकलून लावल्याने मोठा अनर्थ टळला.मात्र घाबरून पळताना तीला दुखापतीला सामोरे जावे लागले.यामुळे वाढत्या भटक्या कुत्र्यांना आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *