उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांची कार्यतत्परता ; शिवशक्तीनगर व कनकनगर जोडणारा पुल स्वखर्चातुन दिला बांधून

0 minutes, 0 seconds Read

 

कणकवली (तुळशीदास कुडतरकर)

 

कणकवली शहरातील शिवशक्तीनगर व कनकनगर येथील नागरिकांनी कणकवलीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्याजवळ शिवशक्तीनगर व कनकनगर येथे जोड रस्त्याची मागणी केली होती, सुशांत नाईक यांनी याची तात्काळ दखल घेत दोन्ही नगर जोडणारा लोखंडी पुल स्वखर्चातून घालून दिला.

 

यामुळे शाळेतील मुलांना येजा करण्यासाठी व नागरिकांना येजा करण्यासाठी सुव्यवस्थित रस्ता उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्या माध्यमातून करून देण्यात आला. यामुळे शिवशक्तीनगर व कनकनगर येथील नागरिकांकडून सुशांत नाईक यांचे आभार व्यक्त केले.

यावेळी वेलिंग मॅडम, संजीवनी पवार, एकनाथ सावंत, समीर सावंत, संदेश जाधव, मनमोहन परब,भाऊजी, रवि भंडारे आदी रहिवाशी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *