इंग्रजीत शिक्षण घेताना मातृभाषेला विसरू नका : शैलेश लाड

0 minutes, 2 seconds Read

 

 

मडूरा नाबर प्रशालेचे स्नेहसंमेलन संपन्न

 

बांदा (मंगल)

इंग्रजी ही जागतिक संवादाची भाषा असली तरी मराठी ही आपली मातृभाषा आहे. विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण घेतले तरीही मातृभाषेला कधीही विसरू नये. आपले उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी नियमित व सातत्यपूर्ण अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, केवळ पाठांतरावर भर न देता विद्यार्थ्यांनी विषय समजून घेऊन विचारशक्ती विकसित करणाऱ्या शिक्षणावर भर द्यावा, असे प्रतिपादन उद्योजक शैलेश लाड यांनी मडूरा येथे केले.

 

मडूरा येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना शैलेश लाड बोलत होते. यावेळी गोगटे वाळके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर, संस्था चेअरमन मंगेश कामत, सरपंच उदय चिंदरकर, ओंकार फाउंडेशन अध्यक्ष गुणेश गवस, रामचंद्र कुडके, लोकल कमिटी चेअरमन भिकाजी धुरी, शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष प्रियांका परब, बांदा प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई, शाळा समिती सदस्य विष्णू सावंत, प्रशालेच्या मुख्याध्यापक नीती साळगावकर उपस्थित होते.

 

याप्रसंगी गोविंद काजरेकर यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे महत्त्व पटवून दिले. यावेळी मंगेश कामत, रामचंद्र कुडके, गुणेश गवस यांनी मार्गदर्शन केले. मुलांनी लिहिलेल्या ‘क्रिस्टल’ या हस्तलिखिताचे अनावरण शैलेश लाड यांच्या हस्ते झाले.

 

याप्रसंगीअहवाल वाचन सहशिक्षिका मयुरी कासार, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेलांकनी रॉड्रीक्स, सांस्कृतिक विभाग प्रमुख स्वरा राठवड यांनी उपस्थितांचे आभार मानले. यानंतर विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *