देवगड-नालासोपारा-वीरार एसटी गाडी सुरू करण्याची मागणी ; आगर व्यवस्थापकांना भाजप पदाधिकारी अंकुश ठुकरूल यांचे निवेदन
देवगड नालासोपारा विरार गाडी सुरू करावी यासंदर्भात देवगड आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलप यांना भाजपा पडेल मंडळ ओबीसी अध्यक्ष अंकुश ठुकरूल यांनी आज निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की,
देवगड जामसंडे, वाडा, पुरूळ, पेडणे, तिर्लोट सौंदाळे, मणचे, डोंगरतिठा या मार्गावरून राजापूर येथे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, या भागातील बहुतांशी प्रवासी नालासोपारा, दहिसर, वसई, विरार भाईंदर या परिसरात राहत आहेत. मात्र या मार्गावर थेट एस.टी. सेवा उपलब्ध नसल्यामुळे येथील प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार विनंती करू नये याची दखल घेतली गेली नाही तरी ग्राहकांची लक्षात घेता देवगड नालासोपारा ही गाडी सुरू करण्यात यावी असे या निवेदनात म्हटले आहे.