वैभववाडी (प्रतिनिधी)
वैभववाडी येथे दोन लाख तीस हजार रुपयाची गोवा बनावटीची दारूसह ईरटीका गाडी जप्त…
ईरटीका गाडीतून राजरोसपणे गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक करणाऱ्या दोघांवर वैभववाडी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. जट्टापा आप्पाशा वंदाले वय 42 रा. कुमठे सोलापूर, व माळसिद्धप्पा परमेश्वर प्रघानियवर वय 38 रा. विजापूर अशी या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून 2 लाख 30 हजार 200 रुपयांची गोवा बनावाटीची दारू व सुमारे 10 लाख रुपये किंमतीची गाडी असा एकूण 12 लाख 30 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री 12. 10 वाजण्याच्या सुमारास वैभववाडी शहरातील संभाजी चौकात करण्यात आली.
