देवगड तालुक्यात पावसाची संततधार सुरूच ; हुर्शी गडदेवाडी येथे गोठा कोसळून सुमारे 40 हजाराचे नुकसान

0 minutes, 1 second Read

 

 

देवगड : प्रतिनिधी

देवगड तालुक्यात पावसाची संततधार सुरूच ; हुर्शी गडदेवाडी येथे गोठा कोसळून सुमारे 40 हजाराचे नुकसान

      सलग चार दिवस पावसाने धुमाकूळ घातला असून तालुक्यात मुसळधार पावसामुळे हुर्शी गडदेवाडी येथे जनावरांच्या गोठा कोसळून सुमारे चाळीस हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.तर तालुक्यात झालेल्या पावसामुळे बरेच ठिकाणी तालुक्यातील प्रलंबित कामे पूर्णत्वास न गेल्याने पर्यायी केलेले रस्ते पर्यायी मार्ग पावसामुळे वाहून गेले आहेत. तालुक्यात शनिवारी १०२ मिमी पावसाची नोंद आहे.

           देवगड तालुक्यात होत असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.मच्छीमारी बांधवानी आपले व्यवसाय बंद करून नौका किनाऱ्यावर घेण्यास सुरुवात केली आहे. हुर्शी गडदेवाडी येथील सहदेव बाबाजी देवळेकर यांच्या घराशेजारी असलेल्या जनावरांच्या गोठा अतिवृष्टीमुळे कोसळून सुमारे चाळीस हजार रुपये नुकसान झाले.तालुक्यात अनेक ठिकाणी विकासकामे,रस्त्यांची कामे सुरू आहेत परंतु ती पूर्णत्वास न गेल्याने संबंधित जोडणाऱ्या गावांचा काहीसा संपर्क तुटला होता. यामध्ये दहीबाव नारिंग्रे,खुडी कोटकामते, रहाटेश्वर वानिवडे, आदी गावांचा सहभाग आहे.तर पावसामुळे नदी ,नाले दुथडी भरून वाहू लागले.

 

 

विहिरीतील पाण्याची पातळी वाढली.मात्र पावसामुळे होत असलेल्या सततच्या विजेच्या लंपडावामुळे नळयोजनाचा पाणीपुरवठा बंद असल्याने देवगड जामसंडे शहरी भागातील तसेच काही ग्रामीण भागातील जनतेची पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *