श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर तर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन ; श्रीकांत सांबारी स्मृती प्रित्यर्थ सांबारी कुटुंब प्रायोजित
श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर,आचरा संस्थेचे माजी अध्यक्ष श्रीकांतभाई सांबारी यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त रामेश्वर वाचन मंदिर तर्फे आणि श्री. मंदार सांबारी आणि परिवार पुरस्कृत मालवण तालुका मर्यादितनिबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .यासाठी अष्टपैलू व्यक्तिमत्त्व मा. श्रीकांतभाई सांबारी , मला भावलेले श्रीकांतभाई सांबारी , गरिबांचे कैवारी श्रीकांतभाई सांबारी, आचऱ्याचे ‘वैभवशाली’ भूषण श्रीकांतभाई सांबारी हे विषय असून
१६ वर्षाखालील (शालेय) गटांसाठी शब्द मर्यादा ३००ते५००आहे.यासाठीबक्षिसे – प्रथम क्रमांक – ५०१/- द्वितीय क्रमांक-३०१/-तृतीय क्रमांक- २०१/-उत्तेजनार्थ १ – १०१रू,उत्तेजनार्थ २ – १०१/-
तर १६ वर्षावरील (खुला) गटासाठी शब्दमर्यादा – ५०० ते १००० शब्द असून बक्षिसे – प्रथम क्रमांक – १२५१/-,द्वितीय क्रमांक- १००१/-,तृतीय क्रमांक – ७५१/- ,उत्तेजनार्थ १ – ५०१/-,उत्तेजनार्थ २ – ५०१/-आहेत.
निबंध स्वहस्ताक्षरात लिहून श्री रामेश्वर वाचन मंदिर, आचरा येथे दि.३० एप्रिल रोजी दुपारी ठीक ३.३० वाजेपर्यंत संस्थेच्या कामकाजाच्या वेळेत आणून द्यावा.सदरची स्पर्धा मालवण तालुका मर्यादित असली तरीही मालवण तालुक्याच्या बाहेरचे परंतु मालवण तालुक्यात कामकाजानिमित्त असलेले कर्मचारीही या स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात.सदर निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण कै.श्रीकांत सांबारी यांच्या द्वितीय स्मृतिदिनादिवशी गुरुवार दि.८ मे २०२५ रोजी दुपारी ठीक ३.३० वाजता रामेश्वर वाचन मंदिर येथे केले जाणार आहे.अधिक माहितीसाठी ग्रंथपाल विनिता कांबळी ०२३६५२४६०१७, मोबाईल नंबर ९४२१२६३३४६या नंबर ला संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.