संजय राऊत राजकारणातील “सडका आंबा”;आमदार नितेश राणेंचा घणाघात

0 minutes, 0 seconds Read

कणकवली दि ५ ऑगस्ट (प्रतिनिधी)

 

संजय राऊत राजकारणातील “सडका आंबा”;आमदार नितेश राणेंचा घणाघात

आदित्यची नार्को टेस्ट करा, सुशांत सिंग,दिशा सालीयन मृत्यूचे सत्य बाहेर येईल

 

 

चांगल्या आंब्याच्या पेटीत सडका आंबा ठेवला तर सगळेच आंबे खराब होऊन जातात. राजकारणातील संजय राऊत हा अशाच पद्धतीचा सडका आंबा आहे.उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून यशस्वी काम केले. आता कार्यतत्पर उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. २०१४ आणि २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली १०० पेक्षा जास्त आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आणले. संजय राऊत याचा मालक उद्धव ठाकरे यांना ७० आमदार सुद्धा निवडून आणता आलेले नाही. त्यामुळे राजकारणातील सडका आंबा असलेल्या संजय राऊत याची समाजाभिमुख काम करणाऱ्या महाराष्ट्राचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांचे वर टीका करण्याची लायकी नाही. अशा शब्दात खरपूस समाचार भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी खा. संजय राऊत यांचा घेतला.
प्रहार भवन येथे आयोजित इलेक्ट्रॉनिक माध्यमांशी बोलताना आमदार नितेश राणे यांनी उबाठा खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला. यावेळी भाजप प्रवक्ते ,आमदार नितेश राणे म्हणाले. उपमुख्यमंत्री फडणवीस त्यांच्यावर टीका करण्यापूर्वी त्यांचे कार्य पहा.
विरोधी पक्षनेते असताना तुझ्या मालकाला एक दिवस झोपायला दिल नाही. एवढे काम त्यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून केले. त्यामुळे टीका करून उपमा देण्याचे काम तुझ्यासारखा सडका आंबाच करू शकतो. अशी टीका आमदार राणेंनी केली.

संजय राऊत,उद्धव ठाकरे आणि राहुल गांधीला सांगेन पवार साहेबांनी अदानी बद्धल भूमिका स्पष्ट करावी.तुझ्या मालकाच्या भूमिकेला फाट्यावर मारण्याचे काम शरद पवार हे कृतीतून करत आहेत. यावर थोबाड उघडाव. त्यांना कधी तरी जाब विचारा.
आज मिया उद्धव ठाकरे वं कुटुंब दिल्लीत आहेत. तिकडे कुडता घालतो कि हिजाब घालेल हे बघावं लागेल. 
        उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सभागृहात फडणवीस साहेबांनी आरोप केले होते.तेव्हा सचिन वाझे वर करवाई करायला तो लादेन आहे का ? असे उद्धव ठाकरे यांनी विचारून कोणतीच कारवाई केली नव्हती.यांच्या घरातली भांडण बाहेर येत आहेत. सचिन वाझेला कोण कुठे घेऊन फिरायचा त्याचे पुरावे मला दाखवावे लागतील.

संजय राउत हे आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करण्याची हिम्मत दाखवेल का? दिशा सालियन आणि सुशांत सिंग प्रकरणात आदित्यची नार्को टेस्ट झाली पाहिजे. सचिन वाजेचा वापर करून कशा पद्धतीने पुरावे नष्ट केले हे समोर अशी मागणी यावेळी आमदार नितेश राणे यांनी केली.संजय राऊत ने ताई ,माई ,अक्का विचार करा पक्का माझा पक्ष प्रमुख छ.. असे वाक्य तयार करून बोलावे असे ही सुनावले.

मुंबईला लुटण्याची हिम्मत कोणी करणार नाही. मुंबई लुटणारे मातोश्री च्या तिसऱ्या मजल्यावर राहतात.त्यांना हद्दपार करण्यासाठी आम्ही महा युती म्हणून एकत्र आहोत.आमचे सरकार पुन्हा येणार आहे.आमचं सरकार धरावीचा प्रकल्प पूर्ण करणार.राऊत ने जूना टेप रेकॉर्डर बंद करावा.

मॅच फ़िक्सिन्गचे आरोप राज साहेबांवर करणारे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कशावर जगत आहेत. हे लोक म्हणजे राजकारनातील डब्बा बेटिंग वाले आहे. राज साहेब बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातं आहेत.

वक्फ बोर्ड चा कायदा फक्त आपल्या देशात आहे. इतर कोणत्याही इस्लामिक देशात हा कायदा नाही. यात सगळे मुसलमान अधिकारी आहेत.त्यात हिंदू लोक सुद्धा असतील.त्यावर मोदी साहेब चांगला निर्णय घेतील.असेही ते म्हणाले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *