शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे – देवगड तहसीलदार आर जे पवार

0 minutes, 0 seconds Read

 

आचरा-अर्जुन बापर्डेकर

शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे – देवगड तहसीलदार आर जे पवार

देवगड तालुक्यातील अतीशय दुर्गम असलेल्या धालवली कोर्ले या भागात शासनाच्या योजनांचा एकत्रित लाभ देण्यासाठी शासनामार्फत येथील मंडळ अधिकारी,तलाठी यांनी घेतलेला उपक्रम कौतुकास्पद आहे.येथील तलाठी सुनीता मेस्त्री कार्यतत्पर आहेत.ग्रामस्थांनी ऍग्रीस्टॅक, वारस तपास संजय गांधी निराधार योजना व अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वेळेत करुन सहकार्य करण्याचे आवाहन देवगड तहसीलदार आर जे पवार यांनी धालवली कोर्ले येथे केले.

शासनाच्या जिवंत सातबारा मोहिमेंतर्गत धालवली व कोर्ले या दोन्ही गावांसाठी बुधवारी वारस तपास कॅम्प घेण्यात आला. या वारस तपास शिबिराला देवगड तहसीलदार पवार यांनी भेट देत उपस्थितांना ऍग्रीस्टॅक,वारस तपास संजय गांधी निराधार योजना व अन्य शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन केले.यावेळी त्यांच्या सोबत देवगड माजी सभापती रवी पाळेकर,पाटगाव मंडळ अधिकारी जनार्दन साईल,धालवली ग्राममहसूल अधिकारी सुनीता मेस्त्री,प्रथमेश आसोलकर,कोर्ले सरपंच विश्वनाथ खानविलकर,धालवली सरपंच जुबेदा सोलकर, उपसरपंच हमजा सोलकर, पोलीस पाटील कोर्ले सुरेश शृंगारे, धालवली पोलीस पाटील अकिल सोलकर, कोतवाल प्रकाश घाडी,फणसगांव मह ई सेवा केंद्राचे शिवराज कुडतरकर,यांसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

धालवली कोर्ले हा देवगड तालुक्यातील टोकाचा सजा असल्याने येथील ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी जाऊन प्रतिज्ञापत्र करणे अतिशय त्रासाचे ठरत होते.यासाठी देवगड तहसीलदार आर जे पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाटगांव मंडळ अधिकारी जनार्दन साईल व ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) सुनीता मेस्त्री यांनी अभिनव संकल्पना राबवित वारस तपास करणे सोईस्कर होण्यासाठी प्रतिज्ञापत्र, सरपंच, पोलीस पाटील दाखले व अर्ज हे एकाच ठिकाणी होऊन जीवंत सातबारा ही मोहीम लवकरात लवकर करण्यासाठी सदरचा उपक्रम राबविण्यात आला.याला या दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.सदर उपक्रमात वारस तपास व मयताचे नाव कमी करणे यांचे ३७ अर्ज प्राप्त झाले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *