तळेरे विद्यालयात 10 एप्रिल रोजी महसूल विभागाचे शिबिर : मुलांना मिळणार एकाचवेळी विविध शैक्षणिक दाखले

0 minutes, 0 seconds Read

 

कणकवली ( प्रतिनिधी)

तळेरे विद्यालयात 10 एप्रिल रोजी महसूल विभागाचे शिबिर : मुलांना मिळणार एकाचवेळी विविध शैक्षणिक दाखले

तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय आणि कणकवली तहसीलदार कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार 9 एप्रिल रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 वा. पर्यंत विविध शैक्षणिक दाखले मिळण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचे शैक्षणिक दाखले एकाच ठिकाणी मिळणार आहेत.

बुधवारी सकाळी 10 वा. या शिबिराला प्रारंभ होईल. यावेळी कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, तळेरे मंडळ अधिकारी श्री. नागावकर, तलाठी कोळपकर, विद्यालयाचे प्राचार्य अविनाश मांजरेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

पुढील शैक्षणिक वर्षी मुलांना विविध दाखल्याची आवश्यकता भासते. आणि आयत्यावेळी अनेक कागदपत्रे जमवणे आणि तालुक्याच्या ठिकाणी जाऊन ते सगळे कामकाज पूर्ण करणे शक्य होत नाही. पालकांचा तो संपूर्ण त्रास वाचवा, यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यादिवशी येताना सर्व पालकांनी आवश्यक ती कागदपत्रे घेऊन शाळेत यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या संधीचा जास्तीत जास्त पालक आणि मुलांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *