देवगड तालुका बौध्दजन सेवा संघाच्यावतीने बुध्दगया महाबोधी महाविहार मुक्ती निर्धार रॅली
देवगड तालुका बौध्दजन सेवा संघाच्यावतीने शुक्रवारी बुध्दगया महाबोधी महाविहार मुक्ती निर्धार रॅली देवगड कॉलेज नाका येथून तहसिल कार्यालयावर काढण्यात आली.या रॅलीत बहुसंख्येने धम्म उपासक व समाजबांधव उपस्थित होते.बोधगया विहार येथिल महाबोधी महाविहार कायदा १९४९ रद्द करण्यात यावा व महाबोधी बुध्द विहार बौध्द धर्मीयांचा ताब्यात देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.याबाबतचे निवेदन तहसिलदार आर.जे.पवार यांच्याकडे देण्यात आले.
देवगड तालुका बौध्दजन सेवा संघाच्यावतीने शुक्रवारी सकाळी भव्यदिव्य निर्धार रॅली काढण्यात आली.देवगड कॉलेजनाका ते तहसिल कार्यालय पर्यंत काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये बहुसंख्येने धम्म उपासक व समजाबांधव उपस्थित होते. देवगड तालुका बौध्दन सेवा संघाच्यावतीने राष्टड्ढपती यांच्याकडे निवेदन देण्यासाठी तहसिलदार आर.जे.पवार यांच्याकडे निवेदन देण्यात आले.या निवेदनामध्ये बिहार येथील महाबोधी महाविहार हे बौध्दांच्या ताब्यात मिळविण्यासाठी गेली कित्येक वर्षे बौध्द भंते प्रयत्न करीत आहेत.त्यांचा या लढ्याला संपूर्ण जगभरातून पाठींबा मिळत आहे.महाबोधी महाविहार हे सन १९४९ च्या कायद्यानुसार समसमास प्रतिनिधींची निवड करून त्यामध्ये खरे पाहता सर्वच्या सर्व बौध्द प्रतिनिधी नेमणे आवश्यक होते मात्र असे न करता बौध्द विहार qहदू धर्मिंयामधील महंत लोकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.ते महंताच्या ताब्यातून तात्काळ मुक्त करण्यात यावे व बौध्द धर्मींयांच्या ताब्यात देण्यात यावे.सन १९४९ बी.टी.अॅक्टवर महाबोधी बुध्द विहार संदर्भात भारतीय राज्य घटनेच्या कलम २४५ नुसार केलेला कायदा रद्द करण्यात यावा व फक्त बौध्द धर्मींयांसाठी नवीन कायदा अस्तित्वात आणावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.आमचा हा लढा महाबोधी महाविहार मुक्तिचा असून न्याय मिळेपर्यंत हा मुक्तिसंग्राम सुरूच राहणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.यावेळी बौध्दजन सेवा संघाचे अध्यक्ष शामसुंदर जाधव, उपाध्यक्ष सुरेश कदम,सचिव सुनिल जाधव, डी.के.पडेलकर, मनोहर सावंत,महिला अध्यक्ष पुजा जाधव, सौ.सुरभी पुरळकर, विनायक मिठबांवकर, विजय कदम, के.एस्.कदम, अजित कांबळे, विशाखा साळसकर, रश्मी पडेलकर, नितेश जाधव, आनंद देवगडकर, श्रीपत टेंबवलकर, दिलीप कदम, राजू साळसकर, समीर शिरगावकर, सुमित कदम, प्रविण मोरे,अभिषेक कदम, महेश परूळेकर आदी पदाधिकारी व बौध्द समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.