नेपाळी युवतीची आंबा बागेत गळफास लावून आत्महत्या ; मिठबाव येथील घटना

0 minutes, 0 seconds Read

 

 

देवगड/ प्रतिनिधी

नेपाळी युवतीची आंबा बागेत गळफास लावून आत्महत्या ; मिठबाव येथील घटना

मूळ नेपाळ येथील व सध्या मिठबाव येथे वास्तव्यास असलेल्या जीरा नरे विश्वकर्मा (२०) या युवतीने मिठबाव येथील गोगटे तळे येथील एका आंबा कलम बागेतील शेतघरात छताच्या लोखंडी पाईपला ओढणीचे साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना ८ मार्च सायंकाळी ५ वा. च्या सुमारास उघडकीस आली.

या घटनेची खबर कमल करण तिरुवा (रा. २१, रा. नेपाळ, सध्या रा. मिठबाव) याने देवगड पोलीस स्थानकात दिली आहे. त्यानुसार देवगड पोलिसांनी घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू अशी केली आहे. आत्महत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव करीत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *