वडाचे झाड अंगावर पडून महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू तळवडेतील दूर्घटना : शोक व्यक्त

0 minutes, 0 seconds Read

वडाचे झाड अंगावर पडून महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू तळवडेतील दूर्घटना : शोक व्यक्त

 

सावंतवाडी । प्रतिनिधी : २४ जुलै २०२४ 

 

तळवडे येथील जनता विद्यालयाची १२ वीतील विद्यार्थिनी शाळेतून घरी जात असताना वडाचे झाड पडून तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तळवडे येथे घडली आहे. सायली सतीश धुरी (१७, रा. मिरिस्तेवाडी, तळवडे ) असे तिचे नाव आहे. या घटनेनंतर तिला त्वरीत सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच तिचे निधन झाल्याचे जाहीर करण्यात आले. या घटनेची माहिती मिळतात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली.
तळवडे बाजार पेठेतील शाळेतून सायली व तिच्या दोन मैत्रीणी घरी परतत होत्या. याचवेळी रस्त्यालगत असलेल्या वडाचे झाड उन्मळून तिच्या अंगावर पडले. यावेळी काही विद्युत वाहिन्याही तुटून रस्त्यावर पडल्या. त्यामुळे तिचा मृत्यू नक्की झाडाची फांदी कडून जखमी झाल्याने की विद्युत मारीत वाहिनीचा स्पर्श झाल्याने झाला याबाबत शंका व्यक्त होत आहे.
तिचे वडील सतीश धुरी यांचा होडावडा बाजारपेठेत पानपट्टीचा स्टॉल आहे. या घटनेची माहिती मिळताच तिचे काका तसेच प्रशालेतील शिक्षक व गावातील ग्रामस्थांनी रुग्णालयात धाव घेतली. या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोक कळा व्यक्त होतात.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *