डॉ. शरयू आसोलकर विद्यार्थ्यांना विचारप्रवण करणाऱ्या दीपस्तंभ – प्रवीण बांदेकर

0 minutes, 2 seconds Read

 

सावंतवाडी (प्रतिनिधी)

 

डॉ. शरयू आसोलकर विद्यार्थ्यांना विचारप्रवण करणाऱ्या दीपस्तंभ – प्रवीण बांदेकर

हा सन्मान केवळ एका व्यक्तीचाच नव्हे, तर नारीशक्तीच्या असीम सामर्थ्याचा -डॉ. शरयू आसोलकर

डॉ. शरयू आसोलकर यांना शिक्षक भारतीचा ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ पुरस्कार प्रदान

“डॉ. शरयू आसोलकर यांच्या कवितांमध्ये संवेदनशीलता, प्रगल्भ विचार, आणि समाजभानाची अनोखी गुंफण आहे. त्या केवळ एक शिक्षिका नसून विद्यार्थ्यांना विचारप्रवण करणाऱ्या दीपस्तंभ आहेत.”असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक श्री. प्रवीण बांदेकर यांनी डॉ. आसोलकर यांच्या कार्याचा गौरव करताना केले.

शिक्षण, साहित्य, आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्रा. डॉ. शरयू आसोलकर यांना सावंतवाडी येथे बालिका दिनाच्या औचित्याने सिंधुदुर्ग शिक्षक भारतीच्यावतीने ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.

यावेळी शिक्षक भारतीचे राज्य कार्यवाह श्री. संजय वेतुरेकर, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रशांत आडेलकर, सचिव श्री. समीर परब, राज्य प्रतिनिधी श्री.चंद्रकांत चव्हाण, कार्याध्यक्ष श्री. प्रदीप सावंत, महिला आघाडी प्रमुख सौ. सुस्मिता चव्हाण, श्री.दीपक तारी, श्री.अनिकेत वेतुरेकर, श्री.माणिक पवार, सौ.शारदा गावडे, सौ. सुमेधा नाईक, श्री. सिद्धार्थ तांबे, श्री. संतोष वैज, श्री. मोहन पालेकर, श्री. अरविंद मेस्त्री, श्री. रमेश गावडे , श्री.परमेश्वर सावळे , श्री. प्रदीप देसाई, श्री. टिळवे सर, श्री. अभिषेक कशेळीकर, श्री. पवन वणवे, श्री. दशरथ सांगळे, श्री. कदम सर, श्री. विद्यानंद पिळणकर, श्री.गोपाळ गवस , श्री. भिवा धुरी, श्री. राजाराम पवार, सौ. दीप वारंग, सौ. रूपा कामत, श्री. सिद्दीकी मुलानी , श्री. विजय ठाकर, श्री.देऊ साईल, श्री.दत्ताराम नाईक, श्री.सुशांत नाईक, श्री.आनंद कदम, श्री. दिलीप गाडेकर, श्री. महेश पास्ते, श्री. विठोबा कडव, श्री. नितिन माने, कुमारी अनन्या वेतुरेकर, कुमारी तीर्था आडेलकर आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना प्रवीण बांदेकर म्हणाले की,शिक्षक भारती सिंधुदुर्ग हा केवळ शिक्षकांचा संघटन नाही, तर हा शिक्षण, सामाजिक परिवर्तन, आणि नारी शक्तीला प्रोत्साहन देणाऱ्या चळवळीचा अविभाज्य भाग आहे. शिक्षण क्षेत्रातील अडचणी सोडवण्याबरोबरच समाजातील विविध क्षेत्रांमध्ये कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहित करणे, हा शिक्षक भारतीचा मूळ उद्देश निश्चितच कौतुकास्पद आहे.असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

सत्काराला उत्तर देताना डॉ.शरयू आसोलकर म्हणाल्या की, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने हा पुरस्कार शिक्षणभारती कडून मला दिला जातो, हे माझ्यासाठी खुप मोठे आहे.मी स्वतः ला भाग्यवान समजते.हा सन्मान केवळ एका व्यक्तीचाच नव्हे, तर नारीशक्तीच्या असीम सामर्थ्याचा आणि तिच्या सतत प्रेरणा देणाऱ्या कार्याचा गौरव आहे.

माझ्या घरामध्ये ज्ञानदानाचे कार्य करणारी माणसे आली आहेत.आज मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित राहिलेत. आणि त्यांच्याकडून माझा सन्मान होतो आहे.हा आनंदाचा क्षण आहे.म्हणूनच आमचे घर खऱ्या अर्थाने धन्य झाले.

शिक्षक भारतीचा हा उपक्रम केवळ पुरस्कार वितरणाचा क्षण नाही, तर शिक्षण, साहित्य आणि संस्कृतीला दिशा देणारी एक प्रेरणादायी चळवळ आहे.मनाने आणि विचाराने या संघटनेच्या विचारांशी बांधिलकी सांगणारेच आहोत आणि राहणार आहोत.शिक्षक भारतीचे राज्य कार्यवाह श्री. संजय वेतुरेकर सरांचे शैक्षणिक आणि संघटनात्मक कार्यात मोठे योगदान आहे.असेही डॉ.आसोलकर यांनी यावेळी सांगितले.

शिक्षक भारतीचे राज्य कार्यवाह श्री. संजय वेतुरेकर यांनी सांगितले, “शिक्षणाचा खरा अर्थ विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या विचारांची पेरणी करणे आहे, आणि डॉ. शरयू आसोलकर यांनी हे कार्य अत्यंत निष्ठेने केले आहे. त्या मराठी भाषेच्या उत्थानासाठी सातत्याने कार्यरत आहेत.”

शिक्षक भारती सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रशांत आडेलकर यांनी डॉ. शरयू आसोलकर यांच्या कार्याचा गौरव करताना म्हटले,”डॉ. शरयू आसोलकर या आपल्या जिल्ह्यातील खऱ्या अर्थाने रत्न आहेत. त्या साहित्य क्षेत्रातील तेजस्वी मोती असून त्यांच्या प्रतिभेमुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला अभिमान वाटतो. डॉ. आसोलकर यांच्या सन्मानाचा मान आम्हाला मिळतो आहे, ही शिक्षक भारतीसाठी अनमोल गोष्ट आहे. आज समाजात अनेक ठिकाणी मतभेद, संघर्ष, आणि धर्माचे ध्रुवीकरण दिसते, अशा अस्थिरतेच्या काळात, डॉ. आसोलकर मॅडम शांत, सुगंधी आणि शीतल व्यक्तिमत्त्वाने समाजाला प्रेरणा देत आहेत.

डॉ. आसोलाकर यांना आम्ही चंदनाचे रोप भेट दिले, ते केवळ सन्मानाचे प्रतीक नसून त्यांच्या कार्याला आमच्या शुभेच्छा आहेत की त्या चंदनासारखेच स्वतःच्या मुळाशी घट्ट राहून आपल्या विचारांचा सुगंध समाजात सर्वदूर पसरवतील. शिक्षक भारतीसाठी हा क्षण प्रेरणादायी आणि गौरवास्पद आहे.”

महिला आघाडी प्रमुख सौ. सुस्मिता चव्हाण यांनी आपल्या मनोगतात म्हटले, “डॉ. शरयू आसोलकर यांच्या कार्याची उपमा अभूतपूर्व प्रेरणेला देता येईल. त्यांची कवितांमधील संवेदनशीलता आणि प्रगल्भ विचार समाजाच्या उन्नतीसाठी महत्त्वाचे आहेत. त्या एक शिक्षिका नाहीत, तर विद्यार्थ्यांमध्ये आशेचा दिवा प्रज्वलित करणाऱ्या मार्गदर्शिका आहेत.”

या पुरस्काराने डॉ. आसोलकर यांच्या कर्तृत्वाचा सन्मान तर झाला आहेच, पण शिक्षण क्षेत्रातील प्रत्येकासाठी तो प्रेरणा ठरला आहे. शिक्षक भारतीच्या या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाची जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर प्रशंसा होत आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुस्मिता चव्हाण यांनी केले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *