जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये २२ ते २८ या कालावधीत शिक्षण सप्ताहाचे आयोजन
देवगड (प्रतिनिधी) २२ जुलै २०२४
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्यातील, सर्व माध्यमाच्या व व्यवस्थापनाच्या माध्यमिक शाळांमध्ये २२ जुलै ते २८ जुलै २०२४ या कालावधीत ‘शिक्षण सप्ताह” साजरा करणेत येणार आहे. याबाबत मा. आयुक्त शिक्षण पुणे यांनी पत्राद्वारे कळविलेले आहे
शिक्षण सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून यामध्ये शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश करणेत आला आहे . हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा ठरणार आहे, सदर शिक्षण सप्ताहामध्ये खालील उपक्रम राबविण्यात येणार आहे
शिवाय झालेल्या उपक्रमांची छायाचित्रे, माहिती एमपीएसपी यांनी उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर अपलोड करावयाचे
आहे. लोकगीते, लोकनृत्य, लोकसंगीत, छोट्या नाटिकांचे सादरीकरण व पालकांना शाळेत निमंत्रित करण्यात येणार आहे.
आठवड्याभरात राबविण्यात येणारे विविध उपक्रम
सोमवार, २२ जुलै- अध्ययन अध्यापन साहित्य दिवस
मंगळवार, २३ जुलै- मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस
बुधवार, २४ जुलै- क्रीडा दिवस
गुरुवार, २५ जुलै- सांस्कृतिक दिवस
शुक्रवार, २६ जुलै- कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस
शनिवार २७ जुलै – मिशन लाईफच्या दृष्टीक्षेपात /इको क्लब उपक्रम /शालेय पोषण दिवस
रविवार २८ जुलै – समुदाय सहभाग दिवस शिवाय मैदानी, शारीरिक व डिजिटल स्वरुपाचे खेळ, बोर्ड गेम्स, भिंतीवरील तक्ते, वाचन कट्टा आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
