व्ही.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश मिडियम प्रशालेत वेशभूषा स्पर्धा उत्साहात पार पडली.

 

 

बांदा (मंगल कामत)

व्ही.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश मिडियम प्रशालेत वेशभूषा स्पर्धा उत्साहात पार पडली.

वेशभूषा स्पर्धा हा केवळ एक फक्त कार्यक्रम नव्हता, या स्पर्धेचा मुख्य हेतू म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि सर्जनशीलता विकसित करणे शिकत असताना आणि मजा करणे.हे विद्यार्थ्यांना संधी देखील देते,इतर मुलांशी संवाद साधणे, स्टेजच्या भीतीवर मात करणे, नवीन कल्पना आणि वर्तन तपासणे तसेच देशाच्या अस्मितेला आकार देणाऱ्या वीरांना साजरे करणे.हा कार्यक्रम सर्जनशीलता, संस्कृती आणि वारसा यांचे एक दोलायमान प्रदर्शन होते, कारण आमच्या नाबरच्या  लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांनीही अगदी इंग्रजी माध्यमाच्याची शाळा असूनही, अगदीच फळे आणि भाज्या पासून ते आपल्याला मदत करणारे आपले दैनंदिन मदतनीस तसेच आपले थोर नेते व आपली ऐतिहासिक परंपरा दर्शविणारे इतिहासातील प्रतिष्ठित व्यक्तींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वेगवेगळ्या वेशभूषा सकारात असताना विद्यार्थ्यांनी त्या प्रत्येक व्यक्तीचा जीवन थोड्या वेळासाठी का होईना पण अनुभवले आहे.

  नर्सरी ते ज्युनिअर केजी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना फळे हा विषय होता तर सिजर केजीच्या विद्यार्थ्यांना भाज्या हा विषय दिला गेला होता. इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी कम्युनिटी हेल्पर्स तिसरी चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल लीडर्स व सहावी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मायथॉलॉजिकल कॅरेक्टर्स हे विषय देण्यात आले.

यामध्ये नर्सरी मधून शिवांशू विश्राम दळवी पहिला, खेमराज प्रताप कोठावळे दुसरा व अरिबा असिफ शेख हिला तिसरा क्रमांक प्राप्त झाला.

जूनियर केजी मधून मोक्ष रौनक पटेल याला पहिला तर अरीयाना राजदत्त बुडकुले दुसरा व उरूज फातिमा शहाबाद शेख यांना तिसरा क्रमांक प्राप्त झाला.

सिनियर केजी मधून ध्रुव दयानंद चव्हाण पहिला, प्रज्ञेश राऊळ दुसरा व मोहसीन रजा खान यांना तिसरा क्रमांक प्राप्त झाला.

इयत्ता पहिली मधून रिवांश गजानन सारंग, उस्मान कलामुद्दीन शेख आणि मंथन जितेंद्र देसाई यांना अनुक्रमे पहिला दुसरा व तिसरा क्रमांक प्राप्त झाला.

इयत्ता दुसरी मधून शांभवी रोशन पालव, चैतन्य दिनेश नाईक, विहान प्रताप कोठावळे यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त झाला.

इयत्ता तिसरी चौथी आणि पाचवीच्या गटामधून सिद्धी सुभाष प्रभूशिरोडकर पहिली निशांत सहदेव बहिरे व हर्ष विजय नाईक दुसरा, फवाद बुरान व स्वरा विरनोडकर यांना तिसरा क्रमांक प्राप्त झाला.

इयत्ता सहावी आणि सातवीच्या गटात अन्वयी पवार पहिली ऋतुराज नाईक दुसरा व खुशी गवस हिला तिसरा क्रमांक प्राप्त झाला.

या स्पर्धेसाठी सहभागी पालक व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले होते. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या वेशभूषानी व्ही.एन. नाबर स्कूलचा रंगमंच अगदी फळांनी, हिरव्या पालेभाज्यानी नटून आणि देशाच्या वीरांनी सजून गेला होता .भारतीय पुराणातील देवी देवतांच्या वेषभूषेने प्रशाला भक्तिमय झाली होती. अशा प्रकारे वेगवेगळे विषय ठेवल्याने ही स्पर्धा वैविध्यपूर्ण झाली. या स्पर्धेचे सूत्रसंचालन शिक्षिका सेजल शेटये आणि सौ.स्नेहा नाईक यांनी केले. बांद्यातील रेश्मा म्हावळणकर व प्रशालेच्या शिक्षिका सौ.शिल्पा कोरगावकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.या स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट असा सहभाग लाभल्याने , फळ, भाज्या आपले मदतनीस व ऐतिहासिक व्यक्ती व सर्व गोष्टीचे महत्त्व विद्यार्थ्यांनी जाणून त्याचा आदर करणे ह्या आमच्या हेतूचा सार्थक झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *