सायबर जनजागृती अभियान अंतर्गत बांदा पोलीस ठाणे हद्दीतील खेमराज इंग्लिश स्कुल व डॉ. व्हि के तोरस्कर कनिष्ठ महाविद्यालय बांदा या शाळेतील विद्यार्थीनी एकत्रित येत बांदा बाजारपेठतून रॅली काढण्यात आली. सकाळी दहा वाजता बांदा बाजारपेठ येथे रॅली काढूत सायबर जनजागृती, नशा मुक्ती व डायल ११२ या विषयावर जनजागृती करण्यात आली. सदर रॅलीत पोलीस निरीक्षक विकास बडवे,,पोलीस अंमलदार,शिक्षक, विद्यार्थी, मिळून ८०ते 90जणांनी सहभाग घेतला. रॅलीस मा. उप विभागीय पोलीस अधिकारी , सावंतवाडी विभाग यांनी मार्गदर्शन केले