आचरा-अर्जुन बापर्डेकर
जनता विद्यामंदिर त्रिंबक येथे निबंध स्पर्धा संपन्न
दत्ता पवार तसेच भाऊ पवार परिवार आणि गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय त्रिंबक यांच्या संयुक्त विद्यमाने *दिवंगत मातोश्री शालिनी शिवराम पवार यांच्या २१ व्या स्मृतिदिनानिमित्त* जनता विद्या मंदिर त्रिंबक येथे सोमवारी ५ वी ते ७ वी व ८ वी ते १० वी अशा दोन गटात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेसाठी वात्सल्यसिंधू आई हा विषय ठेवण्यात आला होता. लहान गटात १३ तर मोठ्या गटात ३२ स्पर्धक अशा एकूण ४५ स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. स्पर्धा यशस्वीतेसाठी सुरेन्द्र सकपाळ, एकनाथ गायकवाड, प्रशांत गोसावी व अमेय लेले यांनी प्रयत्न केले.
