देवगड महाविद्यालय येथे आंतरमहाविद्यालयीन महिला क्रिकेट स्पर्धेत स.का.पाटील.महाविद्यालय संघ, मालवण प्रथम तर श्री.स. ह.केळकर महाविद्यालय संघ द्वितीय

 

देवगड (प्रतिनिधी)

देवगड महाविद्यालय येथे आंतरमहाविद्यालयीन महिला क्रिकेट स्पर्धेत स.का.पाटील. महाविद्यालय संघ, मालवण प्रथम तर श्री.स. ह.केळकर महाविद्यालय संघ द्वितीय

देवगड येथील श्री. स. ह.केळकर महाविद्यालयामध्ये मुंबई विद्यापीठ कोंकण विभाग नं.४ च्या आंतरमहाविद्यालयीन महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. मुंबई विद्यापीठातर्फे दरवर्षी क्रिडा युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. या क्रिडा युवा महोत्सवाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विविध क्रिडा गुणांना वाव देण्यासाठी बुद्धीबळ, क्रिकेट, कब्बडी, व्हालीबॉल, फूट बॉल, बास्केट बॉल अश्या विविध क्रिडा प्रकारांच्या स्पर्धा घेण्यात येतात.

यावर्षी मुंबई विद्यापीठातर्फे कोंकण विभाग नं.४ च्या आंतरमहाविद्यालयीन महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्याचा बहुमान देवगड महविद्यालयाला मिळाला. या स्पर्धेचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाच्या कोंकण विभाग क्रिडा समितीचे सचिव प्रा. शशांक उपशेट्ये यांनी श्रीफळ वाढवून केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार कुनुरे, उपप्राचार्य(प्रशासन) प्रा.श्रीकांत सिरसाठे, अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य श्री.मुंबरकर, क्रिडा प्रमुख प्रा.प्रशांत राउत आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेमध्ये विजेता संघ :-स.का.पाटील.महाविद्यालय, मालवण आणि उपविजेता संघ:- श्री.स. ह.केळकर महाविद्यालय देवगड यांना घोषित करण्यात आले. विजेत्या संघास मुंबई विद्यापीठाच्या क्रिडा विभागाचे सचिव प्रा. श्रीकांत उपशेट्ये यांचे हस्ते ट्रॉफी देऊन आणि उपविजेत्या संघास श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.श्रीकांत सिरसाठे यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून श्री.अमोल मेस्त्री यांनी मोलाची भूमिका निभावली.

यशस्वी संघांचे अभिनंदन उपस्थित मान्यवरांनी केले आणि पुढील फेरीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी पुढील फेरीसाठी कोंकण विभाग क्रमांक ४ च्या क्रिकेट या खेळासाठी प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची नावे निवड समितीतर्फे जाहीर करण्यात आली. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन आणि कार्यक्रमाची सांगता क्रिडा प्रमुख प्रा.प्रशांत राऊत यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करून केली.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *