अश्रू पुसण्याची मला एक संधी द्या : अर्चना घारे-परब
अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब यांनी सावंतवाडी तालुक्यातील गावांमध्ये निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान गावभेट दौरे करत झंझावाती प्रचार केला. यावेळी सातुळी गावातील वेगवेगळ्या समाजातील महिलांनी आपल्या गावात वाडीवस्तीमध्ये जाण्यायेण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही, दळण वळणाची कोणतीही साधने नाहीत, महिलांना पाण्यासाठी खूप आटापिटा करावा लागतो आहे आदी समस्यांचा पाढा त्यांच्यासमोर वाचला.
मुलांना शाळेच्या असंख्य समस्यांना सामोरे जात शिक्षण घ्यावे लागते आहे. शाळांच्या झालेल्या दुरवस्था, सिंधुदुर्ग मधील मुले ही सर्व क्षेत्रात उच्च असून देखील मुलांना या ठिकाणी रोजगार नसल्यामुळे आपली सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र घेऊन वणवण भटकाव लागते आहे. आपल्या घरापासून , गावा पासून आपल्या कुटुंबा पासून लांब आहेत. याच दुःख महिलांनी बोलून दाखवले. तेव्हा उपस्थित महिलांच्या डोळ्यात अश्रू आलेले पाहून अर्चना घारे परब म्हणाल्या, आजचे हे तुमच्या डोळ्यात आलेले अश्रू पुसण्याची मला एक संधी द्या. अस बोलताचक्षणी अर्चना घारे परब यांना देखील अश्रू अनावर झाले.